Breaking News

पहिल्याच मुसळधार पावसात मंत्रालय लागले गळायला राज्य सरकारच्या व्यवस्थेचा उडाला बोजवारा

मुंबई : प्रतिनिधी

पुढील सहा ते सात दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार आज गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवातीलाच मंत्रालयातील अँनेक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावर पावसाने छत कोसळून गळती लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

अँनेक्स इमारतीच्या ७ व्या मजल्यावर पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरील बाजूस असलेले छताचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. त्यामुळे पावसाचे पाणी थेट सातव्या मजल्यावर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दालनाच्या बाहेरील बाजूस पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

जानकारांच्या कार्यालयाबाहेर पाणी पसरले असून कंत्राटी कामगारांना ते पाणी उपसण्याचे काम देण्यात आले आहे. एकूण पाच ते सहा जण त्या परिसरात कार्यरत आहेत . राज्याच्या मंत्र्यांच्या दालनाबाहेर हे चित्र असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे .

दरम्यान याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसून पावसाच्या जोराबरोबरच छतावरून पडणाऱ्या पाण्याची धारही वाढली होती.

याबाबत जानकर यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची माहिती सार्वजनिक माहिती कळविण्यात आल्याचे सांगितले.

तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *