Breaking News

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार २० लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च मिळणार चार मोठ्या आजारांच्या समावेशाची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नविन आजारांचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आला आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत  एका निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देय आहे. तसेच आजारावरील खर्च भागविण्यासाठी अग्रीम देखील अनुज्ञेय आहे. या खर्च प्रतिपूर्तीसाठी आता नविन आजारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या उपचारांपूर्वी २५ टक्के रक्कम कमाल मर्यादेच्या अधीन राहून अग्रीम मंजूर करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

यकृत, हृदय, फुप्फुस प्रतिरोपण प्रत्येकी १५ लाख रुपये, हृदय व फुप्फुस प्रतिरोपण (एकत्र) २० लाख रुपये. बोन मॅरो ट्रान्सप्लांट ८ लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांट ६ लाख रुपये आदी रकमेची तरतूद करण्यात आली.

Check Also

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता …

One comment

  1. Good Decision!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *