Breaking News

सोलापूराची वाटचाल ३०० च्या दिशेने : ३ जणांचा मृत्यू ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, २७५ वर पोहोचली संख्या

सोलापूर: प्रतिनिधी
मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. काल २० कोरोनाग्रस्तांचे निदान झाले होते. त्या तुलनेत आज ५० टक्के जरी संख्या कमी असली तरी ११ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने २७५ वर रूग्णांची संख्या पोहोचली असून पुढील दोन-तीन दिवसात ३०० चा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच आज ३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १७ वर पोहोचली आहे.
सोमवारी १२६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ११ जणांचे सकारात्मक आहे. प्रलंबित अहवाल १०२ जणांचे आहेत.
एकता नगर १, किसान संकुल,अक्कलकोट रोड १, जवाहर नगर १, महालक्ष्मी नगर midc १, सदर बझार लष्कर १, मिलिंद नगर १, बुधवार पेठ १, कुमठा नाका १, हुडको कॉलनी १, रंगभवन १, पाच्छा पेठ १ आदी ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या ४१ जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *