Breaking News

पोलिओ डोस खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करणार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती

नागपुर : प्रतिनिधी

हाफकीन या देशातील एकमेव कंपनीकडून पोलिओ डोस खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखाली समिती नियुक्त केली असून सदर समितीचा अहवाल सादर होताच कारवाई करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि औषधी द्रव्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

विधानसभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हापकीनकडून पोलिओ डोस खरेदीच्या निविदा प्रक्रीयेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनांचे पालन झाले नसल्याने गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान केला.

हाफकीन महामंडळाने तातडीची खरेदी म्हणून इंडोनेशिया येथील कंपनीकडून भारतातील निरलेक या कंपनीने पोलिओ डोस खरेदी केले. परंतु औषधे विकत घेताना या कंपनीचा जगभरात प्रचार-प्रसार करावा अशी अट घालण्यात आली होती. परंतु ही अट कंपनीने अमान्य केल्याने अन्य दोन कंपन्यांना निविदा प्रक्रीयेव्दारे खरेदीचा ठेका देण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी उत्तराच्यावेळी सांगितले.

मात्र त्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी हरकत घेत तातडीची खरेदी म्हणून ज्या पहिल्या कंपनीला निविदा दिली होती. त्यापेक्षा जास्त दर देणाऱ्या कंपनीला ठेका दिल्याच्या विरोधात सदर कंपनी कोर्टात गेल्याची बाब ही उघडकीस आणली. जवळपास दोन कोटीचा गैरव्यवहार यात झाल्याने हाफकीन कंपनीला तोटा झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

या खरेदी प्रकरणी त्याच कंपनीला ठेका दिला असता तर अधिक तोटा झाला असता. कारण मुळ दराने निविदा काढता येत नाहीत. कारण दिवसाला पोलिओ बल्कचे भाव वाढत असतात. याकरीता दुसऱ्या कंपनीला ठेका देण्यात आल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले.

या उत्तराने समाधानी नसलेल्या एकनाथ खडसे यांनी उपप्रश्न उपस्थित करत हाफकीनचे ही देशातील एकमेव कंपनी असून या कंपनीकडून संशोधन करून औषधे तयार केली जातात. मात्र याची दोन युनिट बंद पडण्याच्या मार्गावर असून तेथे कोणी शास्त्रज्ञ यायला तयार नाही. एकाबाजूला शिक्षकांना लाख लाख रूपये पगारी देत असताना शास्त्रज्ञांना ४०-५० हजार रूपये पगार दिला जात असल्याने शास्त्रज्ञ मिळणार कसा ? असा सवाल उपस्थित केला.

हाफकीनचा जागा विकण्याचा कोणताही डाव सरकारचा नसल्याचे आश्वासन मंत्री बापट यांनी देत खडसे यांनी लक्ष वेधलेल्या गोष्टींवर तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *