Breaking News

एसबीआय म्युच्युअल फंड आणणार आयपीओ ७,५०० कोटी रुपये उभारणार

मराठी ई-बातम्या टीम
स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७,५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठा फंड हाउस
SBI म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वात मोठा फंड हाउस आहे. नोव्हेंबर अखेरीस या फंडाची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) ६.३३ लाख कोटी रुपये होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती ५ लाख कोटी रुपये होते. AUM म्हणजे कंपनीकडे गुंतवणूकदारांकडे असलेली रक्कम. आयपीओसाठी कंपनी आपली जॉइंट व्हेंचर विदेशी कंपनी अमुंडीशीही चर्चा करत आहे. येत्या काही महिन्यांत हा आयपीओ आणला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.
बिर्ला म्युच्युअल फंड यंदा लिस्टे़ड
SBI म्युच्युअल फंडाचे मूल्यांकन सध्या ५२ हजार कोटी रुपये आहे. यापूर्वी एसबीआयचे स्वतःचे एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेसने गेल्या वर्षी आयपीओद्वारे सुमारे १० हजार कोटी जमा केले होते. म्युच्युअल फंड उद्योगात सूचिबद्ध होणारी ही पाचवी कंपनी असेल. यापूर्वी एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन म्युच्युअल फंड, यूटीआय म्युच्युअल फंड सूचीबद्ध आहेत. या वर्षी बिर्ला म्युच्युअल फंड ही सूचीबद्ध झालेली चौथी कंपनी होती. गेल्या ४ महिन्यांत SBI च्या शेअर्समध्ये ७० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. SBI चा शेअर्स ५४३ रुपयांवर गेला.
SBI च्या ४ कंपन्या लिस्टेड
यापूर्वी एसबीआयची लाइफ इन्शुरन्स कंपनी गेल्या वर्षी लिस्ट झाली होती. अशाप्रकारे त्यांच्या ४ कंपन्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये गृह वित्त, जीवन विमा, SBI कार्ड आणि पेमेंट आणि SBI चा समावेश आहे. SBI Mutual Fund मध्ये SBI ची ६३ टक्केहिस्सेदारी आहे. तर इतर हिस्सा पॅरिसच्या अमुंडीकडे आहे.
निप्पॉनने प्रथम IPO आणला
निप्पॉन म्युच्युअल फंड हा IPO द्वारे 1542 कोटी रुपये उभारणाऱ्या म्युच्युअल फंडांपैकी पहिला होता. २०१७ मध्ये हा आयपीओ आणला होता. यानंतर HDFC म्युच्युअल फंडाने २०१८ मध्ये IPO द्वारे २८०० कोटी रुपये उभे केले. तर गेल्या वर्षी UTI ने १५४२ कोटी रुपये जमा केले.

Check Also

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *