Breaking News

अर्थविषयक

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »

सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज

मुंबई: प्रतिनिधी या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत. 1. एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ …

Read More »

गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली, आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ऐन सणासुदीतही नागरीकांना महाग कर्जच घ्यावे लागणार

मुंबई: प्रतिनिधी गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली.  आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास …

Read More »

गुगललाही आहे तुमच्या सुरक्षेची काळजी, जाणून घ्या नक्की काय करते गुगल टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या सुविधेमुळे बँकींग व्यवहार सुरक्षित

मुंबई: प्रतिनिधी बँकिंग तसंच आर्थिक देवाण-घेवाणीची सर्व कामं आता ऑनलाईन झाली आहेत. मात्र ऑनलाइन व्यवहारामुळे आर्थिक फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सरकार आणि बँकांकडून लोकांना या ऑनलाईन फ्रॉडपासून काळ काळजी घ्यावी हे पण वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता त्याबाबत काळजी घेत आहे. आपण केवळ आपल्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी …

Read More »

इंटरनेट बँकींगद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी IMPS द्वारे आता २ लाखाऐवजी करा ५ लाख रुपये ट्रान्सफर : आरबीआयचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही पैशाचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आयएमपीएस द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता २ लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात ५ लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस व्यवहार आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास ( 24X7 ) …

Read More »

नवरात्रीच्या मुहुर्तावर अंमलात आणा आर्थिक नियोजनाच्या ९ बाबी आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल उचला

मुंबईः प्रतिनिधी नवरात्र आजपासून (७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो. या पूजेबरोबरच जर आपण आपल्या आर्थिक नियोजनाच्या दिशेनं पावले टाकली तर भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक नियोजन म्हणजे आपलं उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचं एक चक्रच असतं. भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपयुक्त …

Read More »

ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने केली व्याजदरात कपात गृहकर्ज ०.२५ टक्क्याने स्वस्त

मुंबईः प्रतिनिधी बँक ऑफ बडोदाने आपलं गृहकर्ज स्वस्त केलं आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आता बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून सुरू होईल. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. नवीन दर ७ ऑक्टोबर २०२१ पासून लागू झाले आहेत आणि ३१ …

Read More »

१५ वर्ष जुनी दुचाकी, कार, ट्रक वापरणं होणार महाग नोंदणी नूतनीकरण शुल्कात आठ पट वाढ

मुंबईः प्रतिनिधी तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार असेल आणि कारच्या नोंदणीचं नुतनीकरण पुढील वर्षी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १५ वर्ष जुन्या कारची नोंदणी नूतनीकरण आता आठ पटीने महागणार आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आजच्या तुलनेत आठ पट अधिक …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढ सुरूच, घरगुती एलपीजी सिलेंडर महागला गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ

मुंबईः प्रतिनिधी सणांच्या आधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. दर वाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर ५ किलोचा …

Read More »

टाटा-मिस्त्री वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता, हे आहे कारण डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभे करण्याची योजना

मुंबईः प्रतिनिधी रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यामधील वाद आता पुन्हा एकदा वाढू शकतो. वास्तविक शापूरजी पालनजी समूहाचे प्रवर्तक गुंतवणूकदारांना डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. यासाठी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. …

Read More »