Breaking News

सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज

मुंबई: प्रतिनिधी

या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत.

1. एसबीआय

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज ग्राहकांसाठी उत्सव ऑफर सुरू केल्या आहेत. एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. यासह केवळ ६.७० टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे. कर्जाची रक्कम कितीही असली तरी आता कर्जदारांना किमान ६.७० टक्के दराने गृहकर्ज घेता येईल.

2. कोटक महिंद्रा बँक

खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जाचा व्याज दर  ०.१५ टक्के कमी केला आहे. त्यामुळे बँकेचा व्याजर आता ६.६५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला आहे. हे नवीन दर ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू असतील.

3. कॅनरा बँक

सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने एक वर्षाचा एमसीएलआर दर ०.१० टक्क्यांनी कमी करून ७.२५ टक्के केला आहे. नवीन दर ७ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. कॅनरा बँकेने याआधी एमसीएलआरमध्ये (MCLR) ०.१५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती.बँकेने एक दिवसासाठी आणि एक महिन्यासाठी एमसीएलआर ०.१५ टक्क्यांवरून ६.५५ टक्के केला आहे.

4. एचडीएफसी

गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीने गृहकर्जाचा दर कमी करून ६.७० टक्क्यांवर आणला हा व्याजदर २० सप्टेंबर २०२१ पासून लागू झाला आहे. ही विशेष योजना ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत उपलब्ध असेल.

5. येस बँक

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन येस बँकेने होम लोन ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या या ऑफरमध्ये बँक फक्त ६.७ टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

6. पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ५० लाख रुपयांवरील गृहकर्जाचा व्याज दर ०.५० टक्क्यांनी कमी करून ६.६० टक्के केला आहे. या रकमेपेक्षा कमी गृहकर्जावर आधीच ६.६० टक्के दर लागू आहे.

7. एलआयसी हाऊसिंग फायनान्स

एलआयसी हाऊसिंग फायनान्सने २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी गृहकर्जाचा दर ६.६६ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कंपनीने ५० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ६.६६ टक्के केला होता. आता कर्जाची रक्कम ५० लाख रुपयांवरून २ कोटी रुपये केली आहे. ही सवलत २२ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतलेल्या गृहकर्जावर लागू राहील.

8.  डीसीबी 

डीसीबी बँकेने ६ ऑक्टोबर पासून MCLR दरात ०.०५ टक्के कपात केली आहे.

9. बँक ऑफ बडोदा

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा ने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ६.५० टक्क्यांवर आणला आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ग्राहकांना या नवीन दरांचा लाभ मिळेल. हे नवीन दर गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध असतील. बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केलं आहे. ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहील.

10. कोटक बँक

कोटक बँकेने गृहकर्जाचे दर ६.५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन बँकेची ही सवलत ६० दिवस सुरू राहणार आहे.

Check Also

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *