Breaking News

ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने केली व्याजदरात कपात गृहकर्ज ०.२५ टक्क्याने स्वस्त

मुंबईः प्रतिनिधी
बँक ऑफ बडोदाने आपलं गृहकर्ज स्वस्त केलं आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आता बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून सुरू होईल. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. नवीन दर ७ ऑक्टोबर २०२१ पासून लागू झाले आहेत आणि ३१ डिसेंबर पर्यंत लाभ उपलब्ध होईल. हा व्याजदर इतर कोणत्याही बँकेपेक्षा कमी असल्याचा दावा बँकेने केला आहे.
ग्राहकांना गृहकर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केले आहे. बँकेने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, जर तुम्ही आता कर्ज घेतले तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळेल.
सध्या, अनेक बँका ७ टक्के पेक्षा कमी व्याज दराने गृहकर्ज देत आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या गृह कर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून तर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गृह कर्जाचा व्याज दर ६.६० टक्केपासून सुरू होतो.

बँक                                                   व्याज दर (% मध्ये)

बँक ऑफ बडोदा                                       ६.५०

कोटक महिंद्रा बँक                                    ६.६५

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.            ६.६६

ICICI                                                      ६.७०

एसबीआय                                                  ६.७०

पंजाब नॅशनल बँक                                    ६.८०

Check Also

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी, सरकार फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) द्वारे व्होडाफोन आयडियाच्या निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *