सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल असे आश्वासन दिले.

मानधनावर काम करणाऱ्या सिने कलाकारांना वेळेत मानधन मिळावे, कामाचे तास आणि कन्व्हेन्शन अलाउन्स या संदर्भात सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुद्दे मांडले.

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त तुम्मोड, उप सचिव कापडणीस यांच्यासह पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, कनवजीत पेंटल, दीपक पराशर, हेतल परमार आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हास्य अभिनेता सतीश शाह यांनी घेतला अखेरचा श्वास वयाच्या ७४ व्या वर्षी निधन, विनोदातील त्यांच्या टायमिंगचे कौतुक

जाने भी दो यारों आणि मैं हूं ना सारख्या चित्रपटांमध्ये आणि सिटकॉम साराभाई विरुद्ध साराभाई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *