Breaking News

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारले जाणार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, …

Read More »

अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना ४८ तासांचा अल्टीमेटम कायदेशीर नोटीस पाठवित दिला इशारा

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याच्या व्हिडिओ अल्बमला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने फायनान्स केल्याचा आरोप करत त्यासोबतचा फो अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला. त्यावर अमृता फडणवीस यांनी माझी …

Read More »

त्य़ा नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले? राष्ट्रवादी जाणार ईडीकडे ईडीची वेळ घेवून जणार असल्याची नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या अनेक नेत्यांच्या वर धाडसत्र सुरु झाले होते. मात्र त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडीकडून सुरु झालेला तपास कुठेपर्यत झाला याची माहिती घेवून त्या अनुषंगाने असलेली पक्षाकडे जमा झालेली माहिती देण्यासाठी लवकरच ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश… प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

मुंबईः प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच …

Read More »

समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय; याच्यामागे कोण? याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा- नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर …

Read More »

PF व्याजाचे पैसे आले नाहीत तर येथे करा तक्रार १ मिनिटात जाणून घ्या तुमची शिल्लक

मुंबईः प्रतिनिधी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर ८.५ टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर …

Read More »

मुख्यमंत्री रूग्णालयात दाखल म्हणाले…म्हणलं तरी थोडसं दुर्लक्षच झालं केले आवाहन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. …

Read More »

फडणवीस-मलिकांच्या आरोप प्रत्यारोपावर संजय राऊत म्हणाले…आता हस्तक्षेपाची वेळ मलिक हे एका चीडीतून हे सगळं करतायत

मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …

Read More »

न्यायालयाचे आदेश: वानखेडे आणि मलिक दोघांनीही आपले म्हणणे सिध्द करा अब्रु नुकसानीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरू वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याप्रकरणी आणि जात प्रमाणपत्राबद्दल जाहीररित्या उल्लेख केल्याबद्दल दाखल करण्यात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक …

Read More »

मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …

Read More »