Breaking News

विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत मंत्री जयंत पाटील यांनी केला लोकल प्रवास जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास...

मुंबई: प्रतिनिधी पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील …

Read More »

जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही, प्रत्येक तालुक्यात प्रशासकिय इमारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अहमदनगर: प्रतिनिधी कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले. कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी,आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत …

Read More »

एसटी कर्मचारी संपप्रश्नी पवारांच्या भेटीनंतर परब-पडळकर बैठक, पण निर्णय? दोनवेळा चर्चा करूनही बैठक निष्फळ: पुन्हा उद्या होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाच्या मिटविण्याच्यादृष्टीने आज हालचाली सुरु झाल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब यांच्या भेटीला एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आले. …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, …तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची सर्वांनी शांतता पाळण्याचे केले आवाहन

मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनेने दिला पहिल्यांदाच नवाब मलिकांना पाठिंबा मलिकांनी नीट कार्यक्रम सुरु केल्याने ते मागे गेलेत

औरंगाबाद-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मलिक एका चीडीतून या गोष्टी करत असल्याचे मत व्यक्त करत आता हे सगळं थाबायला हवं अशी भूमिका घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता अद्याप तरी काँग्रेस आणि शिवसेनेने नवाब मलिक यांच्याकडून करण्यात …

Read More »

महाराष्ट्रातील दंगलीवर उत्तर प्रदेशातील निवडणूका जिंकण्याचा भाजपाचा डाव दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपाचे षडयंत्र !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय …

Read More »

दंगलीवरून भाजपाच्या माजी मंत्र्यांचे शरद पवारांबद्दल खळबळजनक विधान ज्या दंगली होतात त्या शरद पवारांच्या आशिर्वादाने- माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा आरोप

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी भाजपाने पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपाचे माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक विधान करत जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात. अमरावती, नांदेडमध्ये ज्या दंगली होत आहेत त्या शरद पवार यांच्या आशिर्वादाने होत असल्याचा गंभीर आरोपही बोंडे यांनी केला. …

Read More »

हिंसेला जबाबदार असणार्‍यांवर सरकारच्यावतीने कारवाई होणार वसीम रिझवीला मोकळीक दिल्याने देशातील वातावरण बिघडतंय ;तात्काळ कारवाई करण्यात यावी- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी आंदोलन करणं हा अधिकार आहे, परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्‍या लोकांवर सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान वसीम रिझवी हे देशातील …

Read More »

भाजपाच्या अमरावती बंदला हिंसक वळण: पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात जमावाकडून अनेक दुकानांच्या फलकांची, ठेल्यांची तोडफोड

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल काहीजणांनी अमरावतीत मोर्चा काढत हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने अमरावती बंदची घोषणा केली. मात्र आज सकाळपासूनच शहराच्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि त्याने सुरुवातीला रस्त्यावरील ठेल्यांची नासधुस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजारपेठेत जावून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …

Read More »