Breaking News

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येईल किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

शिर्डी: प्रतिनिधी किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे सत्यात कधी येणार असा सवाल करत याची माहिती आता माध्यमांनीच द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील केले. …

Read More »

जमिनीवरील कायदे आपले पण… नियम न पाळल्यास निसर्ग न्याय ही करतो वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आपण विविध दिनविशेष साजरे करतो त्या विषयाची उत्सुकता आणि आस्था त्या दिवसापूरती नको. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्ये ही झाली पाहिजे असे सांगत जमिनीवरील कायदे आपले आहेत. पण निसर्गाचे नियम वेगळे असून ते नियम न पाळल्यास निसर्ग आपल्या पध्दतीने न्याय …

Read More »

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा उद्योगाच्या ताफ्यात सर्वाधिक बोली लावत एअर इंडियाचा ताबा मिळविला

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी एअर इंडियासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. त्यामुळे ही विमान कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची झाली. टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त बोली लावली होती. एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांकडे आली आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती. तेव्हापासून टाटा समूह एअर इंडियाचा ताबा …

Read More »

राज्य मंत्रिमंडळातील भाच्याची मागणी मामाने केली मान्य, पण भाच्याने घेतला पॉज प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी

अहमदनगर-राहुरी: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात सर्वपक्षांमध्ये काका-पुतणे, मामा-भाचे असे नातेवाईक चांगलेच सक्रीय आहेत. मात्र मंत्रिमंडळात एकाचवेळी मामा-भाचे असलेले आणि या मामा-भाच्यांनी आपापल्या मतदारसंघ आणि विभागाशी संबधित मागण्या एकाच मंचावरून एकमेकांकडे केल्याची घटना तशी दुर्मिळच. पण अशी घटना घडली ती ही आजच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या …

Read More »

आधी मदत जमा करा, नंतर वरातीमागून घोडे नाचवून उपयोग नाही मराठवाड्याच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर

पुणे: प्रतिनिधी निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ यावेळी राज्य सरकारकडून मोठ मोठ्या पॅकेजच्या घोषणा देण्यात आल्या पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपत्तीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता घोषणा खूप झाल्या, आता थेट मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा व्हावी, ही मदत काही महिन्यानंतर नाही तर आता तातडीने करा …

Read More »

मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, “कॉलेज-महाविद्यालये सुरू होणार मात्र या सणाच्या सुट्टीनंतर” सीईटी निकाल आणि दिवाळीनंतर सुरु होण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आणखी तीन दिवसानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असताना कॉलेज-महाविद्यालये कधी सुरु होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टीमुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परिक्षा घेण्यात येत असून त्या परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर सर्व …

Read More »

शेतकऱ्यांसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनो, मोदींची भेट घ्या राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील …

Read More »

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव होणार ‘साहित्यरत्न भूमी’! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता.शेवगाव) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज दिले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अस्थींचे बोधेगाव (ता. शेवगाव) येथे विसर्जन करण्यात आले असल्याने त्या …

Read More »

कर्जावर ८ लाख रुपयांची कार घेतली तर किती रूपयांचे व्याज मोजावे लागेल ? मग समजून घ्या व्याजदर गणना

मुंबई: प्रतिनिधी आपली स्वतःची कार घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. बँका परवडणाऱ्या व्याजदरात वाहन कर्ज जदेत असल्याने कार घेणे अनेकांच्या आवाक्यात आले आहे. वाहन कर्जामुळे एकाच वेळी मोठी रक्कम भरावी लागत नाही आणि दरमहा निश्चित रक्कम (EMI) भरावी लागते. यामुळे त्यांचे मासिक बजेटही बिघडत नाही. वाहन कर्ज घेणारे बहुतेक लोक कारच्या किंमतीच्या ९० टक्के कर्ज घेऊनच खरेदी करतात. जर तुम्हीही असेच काही नियोजन करत असाल, तर कोणती बँक किती व्याज दराने कर्ज देत आहे आणि किती मुदतीचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला कारसाठी एकूण किती पैसे फेडावे लागतील …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, “व्वा रे बिट्या (किरीट सोमय्या) तुला कुणी सांगितलं ?…..” नरेंद्र मोदींनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली

अहमदनगर – पारनेर: प्रतिनिधी किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »