Breaking News

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा उद्योगाच्या ताफ्यात सर्वाधिक बोली लावत एअर इंडियाचा ताबा मिळविला

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी

एअर इंडियासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. त्यामुळे ही विमान कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची झाली. टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त बोली लावली होती. एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांकडे आली आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती. तेव्हापासून टाटा समूह एअर इंडियाचा ताबा घेईल असा अंदाज वर्तवला जात होता.

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने १९३२ मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा हे या कंपनीचे संस्थापक होते. ते स्वतः पायलट होते. या विमान कंपनीला टाटा हवाई सेवा असे नाव देण्यात आले. १९३८ पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ती सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर सरकारने कंपनीतील ४९ टक्के हिस्सा विकत घेतला.

आता झालेल्या कराराअंतर्गत मुंबईतील एअर इंडियाचे मुख्य कार्यालय आणि दिल्लीतील एअरलाइन्स हाऊसचाही समावेश आहे. एअर इंडिया देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. मुंबई कार्यालयाचे बाजारमूल्य १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या, एअर इंडिया देशात ४,४०० आणि परदेशात १८०० लँडिंग आणि पार्किंग स्लॉट नियंत्रित करते.

अनेक वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या एअर इंडियाला विकण्याच्या योजनेत सरकार अपयशी ठरले. सरकारने २०१८ मध्ये ७६ टक्के भागभांडवल विकण्यासाठी बोली मागवली होती. मात्र, त्या वेळी सरकारने व्यवस्थापन नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याची अट घातली होती. त्यामुळे एअर इंडिया खरेदीसाठी कोणी स्वारस्य दाखवले नाही. त्यानंतर सरकारने एअर इंडियाची १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडियाला विकण्याचा पहिला निर्णय २००० साली घेण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मुंबईतील सेंटॉर हॉटेलसह अनेक कंपन्यांमधील आपला हिस्सा विकला होता. अरुण शौरी त्यावेळी निर्गुंतवणूक मंत्री होते. २७ मे २००० रोजी सरकारने एअर इंडियामधील ४० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला.

या व्यतिरिक्त, सरकारने कर्मचाऱ्यांना १० टक्के आणि घरगुती वित्तीय संस्थांना १० टक्के हिस्सा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर एअर इंडियामधील सरकारचा हिस्सा ४० टक्केपर्यंत खाली आला असता. मात्र, त्यानंतर गेल्या २१ वर्षांपासून एअर इंडियाला विकण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने विक्री रखडली.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *