Breaking News

पीएचडी-सेट-नेटधारकांसाठी खुषखबर: प्राध्यापक-प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

खराब CIBIL स्कोअरमुळे कर्ज मिळवण्यात अडचण, या मार्गांनी CIBIL सुधारा आणि मिळवा सहज कर्ज

मुंबई: प्रतिनिधी अनेकदा लोक गृहकर्ज, कार कर्ज किंवा इतर गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतात. पण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला CIBIL स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरात आणि सहज कर्जमिळवण्यास मदत करतो. तुमचा CIBIL स्कोर खराब होण्याची अनेक कारणे आहेत. आम्हीतुम्हाला या कारणांबद्दल आणि क्रेडिट स्कोअर कसा दुरुस्त करता येईल याबद्दल सांगत आहोत. या कारणांमुळे CIBIL स्कोअर खराब होतो – जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल किंवा कमी होईल. – तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही बिल वेळेवर भरले नाही, तर त्याचा तुमच्या क्रेडिट – स्कोअरवर विपरीत परिणाम होतो. – तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही किंवा त्यात उणे शिल्लक असली तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा CIBIL स्कोर सुधारू शकता वेळेवर बिले आणि हप्ते भरा कर्ज किंवा इतर कोणतेही EMI आणि क्रेडिट कार्डची देय रक्कम आगाऊ परतफेड करणे आवश्यक आहे. ही सवय कायम ठेवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रेडिट मर्यादेचा वापर जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा खर्चावर मर्यादा असते. याला क्रेडिट मर्यादा म्हणतात. चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी क्रेडिट मर्यादेच्या ३०% पेक्षा जास्त वापर केला जाऊ नये. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास, तुम्हाला क्रेडिट वापरकर्ता म्हणून पाहिले जाते. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. कर्ज परतफेड ज्या व्यक्तीचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असतो, त्याचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता. ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. चांगला CIBIL स्कोअर मिळविण्यासाठी कर्जाचा इतिहास चांगला असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते बंद करणे टाळावे. त्यासोबत खरेदी करत रहा आणि तुमची बिले भरत राहा. याशिवाय तुम्ही तुमच्या संयुक्त खात्यातील खाती, CIBIL स्कोअर यांचे सतत पुनरावलोकन केले पाहिजे. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. CIBIL स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक चांगला CIBIL स्कोअर ३०० ते ९०० गुणांपर्यंत असतो. जर गुण ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर २४ महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून आहे? ३०% CIBIL स्कोअर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून असतो. सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर २५%, क्रेडिट एक्सपोजरवर २५% आणि कर्जाच्या वापरावर २०% CIBIL स्कोअर कशावर अवलंबून असतो. Share on: WhatsApp

Read More »

गरिबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, काळे कृषी कायदे या विरोधात १४ ते १९ नोव्हेंबर: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे …

Read More »

मलिकांचे आरोप म्हणजे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखे भाजपा नेते आशीष शेलार यांच्याकडून जोरदार पलटवार

मुंबई: प्रतिनिधी हायड्रोजन बाँम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …

Read More »

गृहकर्ज महागण्यास सुरूवात कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदरात वाढ

मुंबई: प्रतिनिधी गृहकर्ज आता महाग होऊ लागले आहे. खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने याची सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडूनआता ६.५५ टक्के दराने  गृहकर्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत हा व्याजदर ६.५० टक्के होता. नवीन व्याजदर ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे. ९ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर या दोन्ही दिवशीही तो लागू होईल. …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली हात जोडून ही विनंती गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका…राजकिय पोळ्या भाजू नका

मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात …

Read More »

नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बाहेर: फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबध उघड दाऊद हस्तक रियाज भाटी फडणवीसांसोबत सतत कसा? बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण

मुंबई: प्रतिनिधी दाऊद हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर सतत सोबत कसा असायचा, तो भाजपाच्या अनेक कार्यक्रमात कसा सहभागी असायचा अशी प्रश्नांची सरबती करत ज्या रियाज भाटीकडे दोन बनावट पासपोर्ट सापडल्याने त्याला डिआरआयने ताब्यात घेतले होते. मात्र त्याला दोन दिवसात जामिन कसा …

Read More »

समेटाऐवजी एसटी अध्यक्ष अनिल परबांकडून ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

मुंबई: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना मधाचे बोट दाखवून त्यांच्या अडचणीत भरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच कोरोनामुळे या एसटी कर्मचाऱ्यांना नव्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने थेट राज्य सरकारच्या सेवेत समाविष्ट केल्याशिवाय पगारीचा प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव झाल्याने याच मुख्य प्रश्नावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!

मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा …

Read More »

शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुकीचे मतदान २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत …

Read More »