Breaking News

गृहकर्ज महागण्यास सुरूवात कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदरात वाढ

मुंबई: प्रतिनिधी

गृहकर्ज आता महाग होऊ लागले आहे. खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने याची सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडूनआता ६.५५ टक्के दराने  गृहकर्ज देण्यात येणार आहे. आतापर्यंत हा व्याजदर ६.५० टक्के होता. नवीन व्याजदर ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत लागू होतील, असे बँकेने म्हटले आहे. ९ नोव्हेंबर आणि १० डिसेंबर या दोन्ही दिवशीही तो लागू होईल. हा बाजारातील सर्वात कमी व्याजदर असल्याचा दावा कोटक महिंद्रा बँकेने केला आहे. मात्र, गेल्या महिन्यातच युनियन बँकेने गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर दिला होता.

युनियन बँक सध्या ६.४५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये कोटक महिंद्रा बँकेने सणासुदीच्या काळात व्याजदर कमी केले होते. त्यावेळी बँकेने ६.५० टक्के दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली होती. ही मर्यादा ८ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

एका निवेदनात बँकेने म्हटले की, ८ नोव्हेंबरपर्यंत बँकेकडून कर्जासाठी कोणताही अर्ज प्राप्त झाल्यास त्यांना ६.५० टक्के व्याजाने कर्ज मिळेल. मात्र, हे कर्जही १५ नोव्हेंबरपूर्वी वितरीत केले जाईल. त्यानंतर कर्ज वाटप झाल्यास ६.५५ टक्के व्याज द्यावे लागेल. हा नवा व्याजदर पगारदार आणि स्वयंरोजगार अशा दोघांनाही लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे. कोटक डिजी होम लोनद्वारे त्वरित कर्ज मंजूर केले जाईल.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक यांनी म्हटले की, रिझर्व्ह बँकेने दिलेला दिलासा मागे घ्यावा. कमी दरातील सवलत आता संपली पाहिजे. सध्या कर्ज आणि ठेवींवर सर्वात कमी व्याजदर आहेत. कर्जावरील व्याजदर ६.४५ टक्के आहेत. तर ठेवींवरील व्याजदर ६ टक्क्यांच्या खाली पोहोचले आहेत. बहुतांष बँका सध्या ६.५ ते ७ टक्के दराने गृहकर्ज देत आहेत.

सध्या सारस्वत बँकेसह अनेक बँका ६.५०% दराने गृहकर्ज देत आहेत. ICICI बँक ६.७०%, SBI ६.७०%, बँक ऑफ बडोदा ६.७५%, बँक ऑफ महाराष्ट्र ६.८०% दराने गृहकर्ज देत आहे. बहुतांश बँका आणि NBFC चे गृहकर्जाचे व्याजदर सध्या ६.९०% च्या खाली आहेत.

एसबीआयने कर्जाची रक्कम कितीही असली तरी क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन फक्त ६.७० टक्के दराने देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड ७.१५ टक्के दराने करावी लागत होती. बँक ऑफ बडोदाने त्यांच्या गृहकर्जावरील व्याजदर ६.७५ टक्क्यांवरून ६.५० टक्के केला आहे. बँकेने म्हटले आहे की ग्राहक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत या नवीन दरांचा लाभ घेऊ शकतात.

Check Also

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *