Breaking News

नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बाहेर: फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबध उघड दाऊद हस्तक रियाज भाटी फडणवीसांसोबत सतत कसा? बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण

मुंबई: प्रतिनिधी

दाऊद हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर सतत सोबत कसा असायचा, तो भाजपाच्या अनेक कार्यक्रमात कसा सहभागी असायचा अशी प्रश्नांची सरबती करत ज्या रियाज भाटीकडे दोन बनावट पासपोर्ट सापडल्याने त्याला डिआरआयने ताब्यात घेतले होते. मात्र त्याला दोन दिवसात जामिन कसा मिळतो असा सवाल करत त्यास फडणवीसांचे संरक्षण होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषद आयोजित करत हा गौप्यस्फोट केला.

जो बनावट पासपोर्ट प्रकरणात आरोपी आहे, ज्याला दाऊदचा हस्तक म्हणून ओळखले जाते. तो व्यक्ती पंतप्रधानांपर्यत कसा पोहोचतो त्यांच्या कार्यक्रमाला कसा हजर राहतो असा सवाल करत पंतप्रधानांच्या कार्यालयात जाणाऱ्या किंवा त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीची आधी पोलिस चौकशी होते, त्याची स्क्रुटनी होते. मग रियाज भाटी कसा पंतप्रधान मुंबईत आल्यानंतर त्यांच्यापर्यत कसा पोहोचला असा सवालही त्यांनी केला.

डिआरआय ही केंद्रीय यंत्रणा असून २०१७ साली बनावट पासपोर्टप्रकरणी रियाज भाटीला ताब्यात घेतले त्यावेळी या डिआरआयचे असिस्टंट कमिशनर या पदावर समीर वानखेडे हे होते. समीर वानखेडे हा तेथे असणे एकवेळ योगायोग असेल मात्र रियाज भाटी दोन दिवसात कसा बाहेर येतो ते ही बनावट दोन पासपोर्ट बाळगल्यानंतरही तो बाहेर कसा येतो हा योगायोग नक्कीच असू शकणार नाही असा अंगुलीनिर्देशही त्यांनी यावेळी केला.

रियाज भाटीचा भावाला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केल्याचे सांगत नागपूरातील कुख्यात गुंड मुन्ना यादव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना त्याला बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष म्हणून फडणवीसांनी केली. नोटबंदीनंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू येथे बनावट नोटांची अनेक प्रकरणे उघडकीस आली. परंतु महाराष्ट्रात एकही प्रकरण उघडकीस आले नाही. परंतु बीकेसीत १४ कोटी ५६ लाख रूपयांच्या बनावट नोटा सापडल्या असताना त्या केवळ ८ लाख ८० हजाराच्या दाखविण्यात आल्या आणि त्याप्रकरणी नवी मुंबईतून इम्रान शेख याच्यासह नवी मुंबई आणि पुण्यातून अन्य दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर लगेच या आरोपींना जामिन मिळाला आणि ते बाहेर आले. हि केस एनआयएला दिली नाही असा असा सवाल करत या बनावट नोटांच्या प्रकरणांना त्यावेळच्या सरकारचे संरक्षण होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तसेच याप्रकरणाचे पाकिस्तान संबध असल्याचे सांगत याची चौकशी करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याचप्रकरणातील एका आरोपीला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष म्हणून फडणवीसांनी नियुक्त केले. तर हैदर आझम हा मुळ बांग्लादेशी असताना त्याला भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष करण्यात आले. त्याच्यावर मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला आणि त्याच्या विरोधातील कारवाई थांबविण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

फडणवीसांच्या काळात अनेक जमिन मालकांना बोलावून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. गुन्हेगारी प्रकरणामध्ये पोलिसांकडून सेटलमेंट केली जात होती आणि त्याला फडणवीसांकडून मंजूरी दिली जायची असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ट संबध असल्याचे सांगत रियाज भाटीची केस कमकुवत करण्यासाठी आणि खंडणी उकळण्यासाठी वानखेडेची मदत फडणवीसांनी घेतल्याचे आरोप करत मागील १४ वर्षे वानखेडे मुंबई का सोडत नाही असा सवालही त्यांनी केला.

यासह अनेक प्रकरणातील आरोपींना फडणवीसांनी राजकारणात आणून राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप करत भाजपाच्या माध्यमातून जी काही खंडणी वसूली आणि गुन्हेगारीकरण सुरु आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठीच फडणवीसांनी काल आरोप केले असून मी जेव्हा जमिन खरेदी केली तेव्हा सलीम पटेल हा २००५ साली हा आरोपी म्हणून त्याला शि‌क्षा झालेली नव्हती असाही त्यांनी यावेळी सांगितले.

काहीजणांना बेनामी मालमत्ता जमा करायची सवय असून वरळी आणि बीकेसीत २०० कोटींचे दोन फ्लॅट कोणाच्या नावावर आहेत याची माहिती वेळ आल्यानंतर बाहेर काढू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *