Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, उद्योग कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले का? सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?

शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. …

Read More »

शिंदे-फडणवीस यांनी नियुक्ती पत्र दिलेल्या ‘त्या’ उमेदवारांनी अजित पवारांचे मानले आभार

राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या पुढाकारासाठी आणि मदतीसाठी आभार मानले. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांना नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो का? निवडणूक आयोग तटस्थता जपेल का?

राज्यातील शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी आहे. मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यास परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली. …

Read More »

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे …

Read More »

विदर्भातील खेळाडूंना आयपीएलमध्ये सुवर्णसंधी पापलीकर ग्रुपचा पुढाकार, नागपूरमध्ये होणार सहा मॅचेस

चंद्रशेखर बर्वे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी; मातृभूमि त्याच्या हृदयात केवळ जीवंत राहत नाही तर आपल्याला या समाजाचं ऋण फेडायचं आहे, हा विचार त्याच्या मनात सतत घोंगावत असतो. आणि मातृभूमीच्या चरणी सेवा अर्पन करण्याची एकही संधी सोडत नाही. याचं जीवंत उदाहरण द्यायचं झालं तर डॉ. अभय पापलीकर यांचं …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घेणे न्यायालयाला अपेक्षित सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया

दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त …

Read More »

नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय

यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित …

Read More »

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विभागातील नियुक्तीपत्रे देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठक सभागृहात झालेल्या या …

Read More »

२० हजारांची भरती, विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव यासह राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे असे १४ निर्णय घेण्यात आले आहेत. यातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, विद्यापीठ कायद्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय आदी निर्णय स्वतंत्र बातम्यांच्या माध्यमातून याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या निर्णयाशिवाय …

Read More »

राज्यपालांचे कुलगुरू निवडीचे अधिकार अबाधित, शिंदे-फडणवीस सरकारने घेतला हा निर्णय विद्यापीठ अधिनियमातील सुधारणा विधेयक मागे घेण्याचा निर्णय

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ सुधारणा विधेयक क्र. ३५ (तिसरी सुधारणा) २०२१ मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता राज्यपालांना असलेले विद्यापीठ कुलगुरू नियुक्तीचे अधिकार पुन्हा पूर्वी सारखे राहणार होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यासाठी १९ …

Read More »