Breaking News

महाराष्ट्र-अमेरिका दरम्यान व्यापाराच्या व गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरिकेत व्यापार परिषद संपन्न

भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरिके दरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्‍वास भारताचे न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट …

Read More »

सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

भारताचे ४९ वे  सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ  घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता पण ते… ... तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार - एकनाथ खडसे

एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी ST ने १.५० लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना एसटीच्या ३ हजार ४०० गाड्यांचे आरक्षण फुल; १९०० गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत. गणेशोत्सवासाठी ST अर्थात एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, चौकशा लावून आवाज दाबण्याचा प्रयत्न दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा …

Read More »

त्या सवालावर संभाजी राजेंनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत दिले ‘हे’ उत्तर मराठा आरक्षण लढा व त्यासंबंधीत चालू घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी पोस्ट मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...

मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण समितीच्या संयोजकांना बोलू दिले नसल्याचा आरोप एका संयोजकाने आज करत संभाजी राजे यांना मराठा समाजाचे नेतृत्व कोणी दिले? आम्हाला बोलायला का दिले नाही? असा सवाल …

Read More »

भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक ;मोदी सरकारचा जाहीर निषेध...

बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील अकरा दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरातमधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध… जाहीर निषेध… मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए… हमे माफ करो बिल्कीस बानो… मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी… नही चलेगी… महिलाओं को दे सम्मान तो होगा …

Read More »

सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले; दोघांना अटक मृत्यूपूर्वीचा नवा व्हिडिओ बाहेर

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. यामृत्यूनंतर फोगट यांच्या बहिणीने आणि त्यांच्या पुतण्याने याप्रकरणी संशय व्यक्त करत काही जणांच्याबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांकडून त्या दिशेन तपास सुरु केल्यानंतर एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात फोगट सोबत दिसणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली …

Read More »

आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अध्यक्ष कळसुत्री बाहुला नसाला पक्षानं आत्मपरिक्षण करावे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीला राहुल गांधीच जबाबदार असल्याची टीका करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावे, असे …

Read More »

अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात आली चक्कर; रूग्णालयात दाखल जे जे रूग्णालयात केले दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. अनिल देशमुख सध्या …

Read More »