Breaking News

सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले; दोघांना अटक मृत्यूपूर्वीचा नवा व्हिडिओ बाहेर

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. यामृत्यूनंतर फोगट यांच्या बहिणीने आणि त्यांच्या पुतण्याने याप्रकरणी संशय व्यक्त करत काही जणांच्याबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांकडून त्या दिशेन तपास सुरु केल्यानंतर एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात फोगट सोबत दिसणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना फोगट यांच्या मृत्यूआधीच्या काही तासांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. हे फुटेज गोव्यातील एका रेस्टॉरंटमधील आहेत.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांना व्यवस्थित चालता येत नसल्याचं दिसत आहे. त्या आरोपी सुधीर सांगवानचा आधार घेऊन चालत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्यासोबत दुसरा साथीदार सुखविंदर सिंगही असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

संबंधित सर्वांनी सोमवारी रात्री पार्टी करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या अंजुना बीचवरील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर तिघंही येथून बाहेर पडले होते, सोनाली फोगट यांना चालता येत नव्हतं. त्या आरोपी सुधीर सांगवानची मदत घेत चालत होत्या. त्या शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनाक्रमानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली फोगट यांना गोव्यातील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत दाखल करण्यात आलं.

आरोपी सुधीर सांगवान हा सोनाली फोगट यांना पाण्यातून काहीतरी विषारी पदार्थ बळजबरीने देत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोगट यांचा मृत्यू होण्यापूर्वी संबंधित आरोपी तिला सर्वजण राहत असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी फोगट यांना उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आलं. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. पण फोगट यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली.

तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून फोगट यांच्या शरीरावर काही जखमा आढळल्याचं डॉक्टरांनी नमूद केलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Check Also

मास्को कॉन्सर्ट हॉल वर दहशतवाद्यांचा हल्ला १०० हून अधिक ठार

नुकतेच रशियात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर कोणताही विरोधक उभा राहिला नसल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *