Breaking News

सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपाकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून स्‍वच्‍छता अभियानाची सुरूवात

छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच दोन्‍ही पुतळयांना पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवताच राज्यपालांकडून निवड समिती स्थापन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना बहाल करण्यात आले. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जी नावे सुचवतील त्यातील एका नावास पसंती देण्याचा पर्यायही राज्यपालांना देण्यात आला होता. मात्र राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. नुकत्यात झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कुलगुरू …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची;यातून केंद्रसरकार असंवेदनशील दिसते...

देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपा सरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर… सण – उत्सव साजरे करण्यावर… आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला. दरम्यान ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी …

Read More »

‘आदर्श’ घालून देणाऱ्या नेत्याच्या विधानांना फारसे महत्व देण्याची गरज नाही देवी कुणाच्या पाठीशी ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले, खैरे, दानवेंच्या टीकेला म्हस्के यांचं सडेतोड प्रत्युत्तर

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार …

Read More »

बदलापूर आणि अंबरनाथच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश कुळगांव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेर सर्वेक्षण आणि शाळा हस्तांरणासाठी निधी देणार

कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे व नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास होणार केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासकार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, शहरी भागात स्मार्ट मीटर बसवा ऊर्जा विभागाचा आढावा

महावितरणने आवश्यकतेनुसार सुरूवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसवावेत आणि या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामिण भागातही स्मार्ट मिटर बसविण्यात यावेत. याशिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे आज झालेल्या …

Read More »

शिंदे विरूध्द ठाकरे संघर्षाशी संबधित १५ विषयांवर १ नोव्हेंबरला सुनावणी घटनापीठाकडून सुनावणीची तारीख जाहीर

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे आणि कोणाची शिवसेना खरी या याचिकेवर नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने निर्णय देत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र उध्दव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे गटाकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात तब्बल १५ याचिकांवर निर्णय कधी होणार याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचे वस्तु संग्रहालय उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार

महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात राज्य वस्तुसंग्रहालय साकारण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, पुरातत्व विभागाचे …

Read More »

मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष प्रा. पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मराठा जागर परिषद या संघटनेचे अध्यक्ष व युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संभाजी दादाराव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष …

Read More »