Breaking News

अंधेरी निवडणुक: उध्दव सेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपाकडून पटेल यांचा अर्ज दाखल उध्दव सेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन

राजीनामा स्विकारण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटके लगावल्यानंतर अखेर आज सकाळी मुंबी महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गुंदवली येथील शाळेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने अर्ज भरला. तर भाजपाने माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल …

Read More »

शिंदे गटाच्या आमदारांची मंजूर कामे भाजपाच्या मंत्र्याने रद्द केल्याने धुसफुस शिंदे फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गट आणि भाजपाचे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये मंत्री पदावरून तर पालकमंत्री पदावरून तर आपला मूळ मतदार संघ बदल्यावरून नाराजी नाट्य रंगू लागले असताना आता या सरकारमध्ये विकास कामं रद्द करण्यावरून पुन्हा एकदा अंतर्गत …

Read More »

राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे यांच्या पुतण्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या बंधुचे चिंरजीव अर्थात पुतणे अवधूत तटकरे यांनी आज अखेर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबऴ उडाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. माजी आमदार …

Read More »

शिंदे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी अग्रिम मिळणार

दिवाळीला आता काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालण्याच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त अग्रिम देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण उत्साहात साजरा होणार आहे. राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे… आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा… येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा …

Read More »

१० वर्षानंतर प्रा.साईबाबा यांच्यासह इतर जण निर्दोष मुक्त नक्षलवादी चळवळीशी संबध असल्याचा होता ठपका

नक्षलवादी चळवळीशी संबध सहभागी असल्याचा ठपका ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा.जी.एन.साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे जवळपास १० वर्षे साईबाबा यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व …

Read More »

आणि भुजबळांनी सांगितले संपत्ती कशी आली आणि शिवसेना सोडल्यानंतरचा किस्सा

ncp leader chhagan bhujbal on his birthday छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे, …

Read More »

महाराष्ट्र सदनाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व

दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील …

Read More »

उध्दव ठाकरेंचे म्हणालेः आम्ही धक्काप्रुफ, वादळ निर्माण करणारे सोबत

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख करत शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली. मात्र आता आम्ही धक्काप्रमुफ असून वादळं निर्माण करणारी माणसं आमच्यासोबत आहेत असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात …

Read More »