Breaking News

राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे यांच्या पुतण्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या बंधुचे चिंरजीव अर्थात पुतणे अवधूत तटकरे यांनी आज अखेर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबऴ उडाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

माजी आमदार अवधूत तटकरे यांच्याबरोबरच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला. मीरा भाईंदरमधील एका काँग्रेस नगरसेवकानेही भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दिप्ती भट्ट, अनिता पाटील व कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अवधूत तटकरेंचा भाजपा प्रवेश म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा झटका आहे व निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले की, युतीमध्ये भाजपाने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजपा स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करत आहे. रायगड, पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सर्वत्र भाजपा कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत.

अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद बारा वर्षे भूषविले होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते.

यापूर्वी आमदाराकी साठी अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवधूत तटकरे यांना उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदारकीही दिली. मात्र त्यांचा कालावधी संपला आहे. तसेच सध्याच्या राजकिय परिस्थितीत पुन्हा एकदा आमदारकी मिळण्याची शक्यता दूरापास्त असल्याने अवधूत तटकरे यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *