Breaking News

कॉम्रेड कुमार शिराळकर : एक मौल्यवान अष्टपैलू हिरा शिराळकर यांच्या निधनानिमित्त कॉ. डॉ. अशोक ढवळे लिहिलेला खास लेख

कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या जाण्याने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर महाराष्ट्राच्या समग्र डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीने एक मौल्यवान अष्टपैलू हिरा गमावला आहे. गेल्या ४० वर्षांचा एक सच्चा कॉम्रेड आणि मित्र मी गमावला आहे. वर्गसंघर्षातून क्रांतिकार्याकडे विधायक कार्यातून क्रांतिकारक कार्याकडे झालेल्या कुमार यांच्या प्रवासातून त्यांची संवेदनशीलता आणि अन्याय्य व्यवस्थेबद्दलची चीड …

Read More »

नाना पटोलेंचा इशारा, .. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला …

Read More »

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते घरोघर जाऊन याबद्दल जागृती करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले. ते मुंबई …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चला जाणूया नदीला” दुसऱ्या टप्प्यातील अभियान लवकरच

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला ” अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर वेग घेणार असून वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हावार समित्यांची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. यासंदर्भातील शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अभियानाचे यश लोकसहभागात …

Read More »

अजित पवार म्हणाले, …महाराष्ट्राची ही संस्कृती नाही

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यापासून अनेक जिल्हा आणि विभागांना देण्यात आलेला निधी रद्द करण्याचे काम सुरु झालेले आहे. त्याचबरोबर आघाडीच्या विविध मंत्र्यानी घेतलेल्या विकास कामांनाही स्थगिती देण्यात येत असल्याचे उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले असून महाराष्ट्राची ही संस्कृती …

Read More »

दिवाळीच्या तोंडावर लालपरीच्या भाड्यात वाढ २१ ते ३१ ऑक्टोबर, दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ

दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २०.१०.२०२२ व २१.१०.२०२२ रोजीच्या मध्यरात्री ००:०० नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. …

Read More »

भंडारा शहरातही धावणार मेट्रो

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेट अॅण्ड वॉच

सध्या राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गट कोणाची ताकद अधिक हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …

Read More »

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बावनकुळे आणि परब यांच्याकडून परस्पर पूरक दावे दोघांनीही केला आपलाच उमेदवार विजयी होण्याचा दावा

अंधेरी विधानसभा पोट निवडणूकासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके आणि संदीप नाईक या दोघांनी अर्ज भरले. तर भाजपा-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा …

Read More »

अंधेरी निवडणुक: उध्दव सेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपाकडून पटेल यांचा अर्ज दाखल उध्दव सेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन

राजीनामा स्विकारण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटके लगावल्यानंतर अखेर आज सकाळी मुंबी महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गुंदवली येथील शाळेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने अर्ज भरला. तर भाजपाने माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल …

Read More »