Breaking News

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनो राहण्याची अडचण आहे ? तर या ठिकाणी अर्ज करा शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, …

Read More »

भाजपा पार्टी स्थापना दिनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, कार्यकर्त्यांनो हा संकल्प करा… लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा तयारी करा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ …

Read More »

शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहीत म्हणाले, आयात नको शेतकऱ्यांना फटका बसेल… दुग्धजन्य पदार्थांची आयात नको

दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल अशी भीती व्यक्त करतानाच या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. वर्तमानपत्रात यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातमीचा दाखलाही त्यांनी दिला आहे. …

Read More »

नायब तहसीलदार संघटनेची घोषणा, बेमुदत संप तात्पुरता मागे पण मे नंतर पुन्हा.. मे महिन्यापर्यंत ग्रेड-पे सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

राजपत्रित अधिकारी पदाचा ग्रेड-पे देण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केल्याने राज्यातील नायब तहसीलदारांनी आपला बेमुदत संप आज स्थगित केल्याची घोषणा केली. मे महिन्यापर्यंत नायब तहसीलदारांना त्यांच्या मागणीनुसार ग्रेड-पे मिळाला नाही तर पुन्हा संप केला जाईल असा इशाराही महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने दिला आहे. नायब तहसीलदारांना १९९८ मध्ये राजपत्रित …

Read More »

संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा,…तर ते खरे गृहमंत्री शोभतील काडतूस असाल तर भ्रष्टाचाऱ्यांवर वापर करा

काडतूस असतील तर त्यांनी त्याचा वापर भ्रष्टाचाऱ्यांच्या करावा. तर ते खरे गृहमंत्री शोभतील. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहेत. पण ती भिजलेली काडतूस आहेत. त्यामुळे काही होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून सातत्याने गैरवापर …

Read More »

गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती, कोरोना काळात मागे पडलेले अभियान पुन्हा सुरु राज्यात अवयवदान जनजागृती अभियान

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना राबविली होती. त्यावेळी अवयव …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन

राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच केले, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कर्तव्य मल्याळम वृत्तवाहिनी मिडिया वन ला न्यायालयाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश चुकीचा ठरवला आहे, ज्याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली मिडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास सरकारकडून नकार देण्यात आला होता. गृह मंत्रालयाकडून सुरक्षेसंबंधी मंजुरी न मिळाल्यामुळे मीडिया वन चॅनेलच्या प्रसारण परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मीडिया वन वृत्तवाहिनीने केंद्र सरकारच्या या निर्णयाला …

Read More »

पुण्यातील उद्धव ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश हर्षवर्धन पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश

उद्धव ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, नीरा बाजार समितीचे संचालक भानुकाका जगताप यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय …

Read More »

कार्यकर्त्यांच्या वन्समोअरवर आदित्य ठाकरे म्हणाले, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात… गद्दार गँगला मदत करणाऱ्या चिलट्यांचे जेलभरो करणार

शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी …

Read More »