Breaking News

Editor

२०१९ पूर्वीच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी समित्या स्थापन पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक हिताच्यादृष्टीकोनातून निरनिराळ्या समस्या आणि प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध सामाजिक संस्था, राजकिय पक्षांकडून आंदोलने, मोर्चा काढणे, घेराव घालणे, निदर्शने करणे, बंद घोषित करणे इत्यादी मार्गाचा अवलंब करण्यात येतो. अशी आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतात आणि हे खटले वर्षानुवर्षे सुरु राहतात. या पध्दतीने …

Read More »

महाराष्ट्राचा मास्टशेफ व्हायचाय? मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच यामाध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. स्पर्धेतील १५ सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी १० हजार रुपये, ४० रेसीपींना प्रत्येकी ५ हजार रुपये तर उत्कृष्ट १०० रेसीपींना प्रत्येकी २ हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील.  शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध …

Read More »

पवार म्हणाले, आम्ही तिघे मिळून एकत्रित सरकार चालवतो, पक्ष नाही सहकार खाते, विधानसभा अध्यक्ष, स्वबळाच्या नाऱ्यावर पवारांनी भूमिका केली स्पष्ट

बारामती: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्यावरून राज्यातील साखर कारखानदारीबद्दल अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत होते. तालिका अध्यक्ष तथा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरून केलेली विधाने यासह काँग्रेस पाठोपाठ आता शिवेसेनेनेही दिलेला स्वबळाचा नारा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास …

Read More »

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती

मुंबई: प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली. कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या …

Read More »

आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही! तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत …

Read More »

राज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांबरोबरच सरकारशी संबधित सर्व संस्थामधील कर्मचारी-अधिकऱ्यांनी आपली मालमत्ता आणि दायित्वाची माहिती दरवर्षी राज्य सरकारकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र काहीजण ३१ मार्च पूर्वी आपली मालमत्ता सादर करत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई आणि पदोन्नती नाकारण्याचे स्पष्ट आदेश संबधित विभागांना सामान्य …

Read More »

सर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी माहिती अधिकार कायद्यांतर्गंत मिळालेली कागदपत्रे ही खरीच आणि विश्वासार्ह असतील असे नसल्याची टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने करत वकिलांनी एकाच मुद्यावर अडून बसण्याचे सोडून द्यावे असा सल्लाही न्यायमुर्ती ए.एम.खानविलकर आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने दिला. अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आशिषकुमार सक्सेना यांनी अपील केले. त्या याचिवेकवरील सुणावनी …

Read More »

मत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा नाना पटोलेंच्यावर पलटवार तर मुख्यमंत्र्यांना इशारा राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पु आहेत तसे महाराष्ट्रातील हे एक पप्पु

पुणे: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाढत्या महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीकेची झोड उठवित अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित दोन कारखान्यांचा उल्लेख होण्याबद्दल आरोप केला. राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत. ते …

Read More »

शालेय शिक्षण मंत्री गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या वाहनाला अपघात

हिंगोली: प्रतिनिधी दोन दिवसांपासून हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणालाही ईजा झाली नाही. मंत्री गायकवाड या एक कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका ठिकाणाची पाहणी करण्यासाठी चालल्या असताना एका मिनी टेम्पोने त्यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूस किरकोळ नुकसान …

Read More »