Breaking News

Editor

रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू खारकीव्ह मध्ये करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात झाली दुर्घटना

मागील सहा दिवसापासून रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. मात्र युक्रेनला रस्त्यावरून महत्वाच्या शहरांकडे सरकणाऱ्या रशियन सैन्याला रोखण्यात काही प्रमाणात यश आलेले असले तरी रॉकेट हल्ला, मिसाईल हल्ला किंवा विमानातून बॉम्बहल्ला रोखण्यात युक्रेनला आणखी म्हणावे तसे यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर खारकीव्ह मधील एका इमारतीवर आज रशियाने रॉकेट हल्ला केला. …

Read More »

महाराष्ट्रातील “या” सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’ आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिकाही पुरस्काराने गौरवित

शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी  यांच्या  हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी  गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …

Read More »

छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. तथापि, राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची …

Read More »

संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर म्हणाले, आता केंद्राने आरक्षण मिळवून द्यावे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते फळांचा रस घेत सोडले उपोषण

मराठी समाजाच्या विविध मागण्यांप्रश्नी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आमरण उपोषणाचा निर्णय घेत मागील तीन दिवस उपोषण सुरु केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आझाद मैदानावर उपोषण सुरु केले. आज सकाळी संभाजी राजे यांच्या शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चेची फेरी पार पडली. यावेळी राज्य सरकारकडून राजे …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे तर हेमंत नगराळे सुरक्षा मंडळाचे संचालक राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची …

Read More »

लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल फडणवीसांनी महाराष्ट्रात राबवले रश्मी शुक्ला या तर फक्त प्यादं, त्यांना आदेश देणा-या मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला पाहिजेः अतुल लोंढे

फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे …

Read More »

शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपा नेते गप्प कसे? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा …

Read More »

उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …

Read More »

मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रभाव घटला ? अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्राचे चार मंत्री पोलंड-युक्रेन सीमेवरील घटनेनंतर मोदी सरकारचा निर्णय

मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला …

Read More »