Breaking News

Editor

राजकिय पक्षांच्या फंडिंगवरून आयकर विभागाची छापेमारी महाराष्ट्रासह देशभरात केली छापेमारी

आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई …

Read More »

आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे मात्र मला यात पडायचे नाही. मात्र मंत्री पदासाठी मी ठाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना भवनातच पक्षप्रमुख म्हणूनच शोभून दिसतात असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लगावला यावेळी शिंदे भाजप सरकारात आपल्याला मंत्री …

Read More »

सरपंच पदासह ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ‘या’ तारखेला होणार मतदान थेट सरपंचपदांसह १,१६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी …

Read More »

भाजपा खा. डॉ अनिल बोंडे यांचा मोठा दावा, मुस्लिम तरुणाचा हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह विवाह बोगस असल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा दावा करत हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, असा दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती …

Read More »

मुद्दा होता तरूणीच्या अपहरणाचा पण नवनीत राणा यांनी विषय लावून धरला रेकॉर्डींगचा पोलिस स्थानकातच फोन कॉल रेकॉर्डिंग का केला म्हणून पोलिसांना विचारला जाब

उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही हिंदू-मुस्लिम वाद आणि लव जिहादचा मुद्दा तापविण्याच्या भाजपाच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एका मुस्लिम मुलाने हिंदू तरूणीचे अपहरण केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे ही घटना अमरावती जिल्ह्यातील असल्याचाही गौप्यस्फोट केला. त्यानंतर याप्रश्नी राजापेठ पोलिस स्थानकात पोलिसांना जाब विचारण्यासाठी भाजपा समर्थक …

Read More »

उध्दव ठाकरे यांना सांगितले, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही संजय राऊत यांच्या भेटीवरून पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली भूमिका

नुकतेच शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रहायचे तर मनाने नाही तर नाही असे सांगत मी त्यावेळीच सांगितले माझा दरवाजा उघडा आहे. जायचं तर खुशाल जा आणि रहायचे असेल तर रहा. माझ्यासोबत असलेल्या निष्ठावंतांचा अभिमान असल्याचे ही स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी त्यांचे निष्ठावंत आणि विश्वासू असलेले …

Read More »

मुंबईतील गणेशोत्सवांना आणखी १५ देशांच्या महावाणिज्य दूतांनी दिल्या भेटी गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल-- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजिकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन …

Read More »

ठाकरे विरूध्द शिंदेः घटनापीठाने सांगितलं, २७ सप्टेंबरला सांगणार काय करायचे ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत देणार निर्णय

राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …

Read More »

मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश, विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री महाजन यांच्याकडून आढावा

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा महाजन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, हाफकिन …

Read More »

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ …

Read More »