Breaking News

Editor

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन ११ सप्टेंबरला दिल्लीत शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणूका यावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. यावेळी होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूकीची सविस्तर माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, हे शिंदेसरकार ‘फक्त घोषणा सरकार’ मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करतेय

शिंदेसरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले…दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही… ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले… हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे …

Read More »

भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही

अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या मनात नसताना तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. त्यापाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तर थेट राजापेठ पोलिस ठाण्यात जात पोलिसांनाच फैलावर घेतले. मात्र आज अखेर ती पळवून …

Read More »

राज्यात गुड गर्व्हनन्ससाठी मुख्यमंत्री शिंदेकडून माजी सचिवांची टीम सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी प्रशासनाचे व्हावे सुशासन...!

राज्यातील गुड गर्व्हनन्स अर्थात सुशासन आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिवांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम गुड गर्व्हनन्स निर्माण करण्यासाठी नव्याने नियमावली तयार करेल. त्यासाठी या समितीत राज्याच्या सहा माजी मुख्य सचिवांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात …

Read More »

भाजपाचा शिवसेनेला टोला, पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार याची प्रतिक्रिया

सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले. सत्तेतील शिवसेना पक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारने कुटुंबियांना का दिला ? याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव- भाजपा देश के लिए हानिकारक है..

भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. परंतु २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी …

Read More »

हवामान विभागाचा इशाराः पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनांना सावधगिरीच्या सूचना

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. …

Read More »

दिवाळी नंतर उडणार मनपा निवडणुकांचा बार? गणेशोत्सवातील गणेश दर्शनाचे निमित्त त्यासाठीच

कोरोना काळातील कडक निर्बधामुळे सार्वजानिक सण उत्सव साजरे करण्यात मोठा अडसर होता.परंतू आता सार्वजानिक सण उत्सवाचे योग जळवून लोकांच्या कार्यकत्त्यांच्या भेटीगाठी यातूनच मनपा अर्थात महापालिकांच्या निवडणुकांची तयारी भाजपा, शिंदे गट आणि मनसेने यांनी मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. सध्या सार्वजानिक गणेशोत्सव सुरू आहे …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, द्वेषाच्या राजकारणामुळे वडीलांना गमावले पण… राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून काँग्रेसची भारत जोडो यात्रा

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला भव्य सुरुवात होणार असून, राहुल गांधींनी त्याआधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले. श्रीपेरुंबदुर येथेच २१ …

Read More »

राजकिय पक्षांच्या फंडिंगवरून आयकर विभागाची छापेमारी महाराष्ट्रासह देशभरात केली छापेमारी

आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई …

Read More »