Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन ११ सप्टेंबरला दिल्लीत शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्ली येथे १० व ११ सप्टेंबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी, बदल, देशातील राज्यांच्या निवडणूका यावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

यावेळी होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूकीची सविस्तर माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्ष कोरोना काळात ही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्याची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कॉन्स्टीट्यूशन क्लब नवी दिल्ली येथे विस्तारीत कार्यकारिणीची सभा होणार आहे. त्यानंतर तालकटोरा स्टेडियमवर ११ सप्टेंबरला हे आठवे अधिवेशन होणार आहे. महाराष्ट्रात काही अडचणींमुळे राज्याची निवडणूक लांबली आहे. त्यामुळे सभासद नोंदणीसाठी महाराष्ट्राने आणखी कालावधी लागेल अशी विनंती केली. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत राज्यातील नोंदणी वाढवली आहे. त्यानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया होईल तशी मुदतवाढ केंद्रीय समितीने दिली असल्याचे हेमंत टकले यांनी सांगितले.

या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय सरचिटणीसांचा कारभाराबाबत रिपोर्ट असतो. याशिवाय पक्षाची ध्येयधोरणे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या भाषणात व्यक्त करतात असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच विद्यार्थी व युवक यांना बोलावण्यात आले आहे. यानंतरची चळवळ ही युवक व विद्यार्थी याच्यातून गतीशील केली जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *