Breaking News

Editor

नाना पटोले यांचा सवाल, मग केंद्र सरकार त्या संघटनांवर बंदी का घालत नाही? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही

मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव …

Read More »

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच …

Read More »

आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रूग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असून, यासंदर्भातील कामाबाबत …

Read More »

महाराष्ट्रातील एक अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशिल शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने …

Read More »

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पी चर्म रोगाची …

Read More »

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ? राज्य सरकारकडून अधिकृत माहिती नाही पण प्रवास महागणार रिक्षा, टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्र्याची सकारात्मक चर्चा

रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, सर्वाधिक चर्चा काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची कारण…

देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु असून विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. अमृतवाहिनी शेती …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, उत्साहात या, शिस्तीने या पण गालबोट… सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लोकशाहीला दिशा देणार असेल

शिवसेनेतील बंडानंतर परंपरागत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आणि पक्षावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यापैकी शिवसेनेवरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नकारघंटा कळविल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत उध्दव ठाकरे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात नवीन आष्टी - अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर शासन भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अहमदनगर – बीड – परळी …

Read More »