Breaking News

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पी चर्म रोगाची बाधा झाली होती. सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले असून ती जनावरे आता निरोगी झाली आहेत.

आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.

मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण ३२२६ गोवर्गीय जनावरे असून ३२०६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. या उपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक १९१६, 022 2556 3284, 02225563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक १९६२ यावर संपर्क साधावा असेही आवाहन डॉ. शैलेश पेठे यांनी केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *