Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही

मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरूनही भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले.

या जनआक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नकोत. आम्हाला रोजगार हवाय असे सांगत मुख्यमंत्री हे फक्त दिल्लीत स्वत:साठी जातात पण महाराष्ट्रासाठी एकदाही जात नाहीत असा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर करत कोणता प्रकल्प किती कोटींचा आहे किती रोजगार मिळणार आहे याची कोणतीही माहिती मुख्यमंत्र्यांना नसते. तरीही ते चुकीची माहिती विधिमंडळाच्या अधिवेशनात देतात असा आरोप करत हे सरकार आल्यावरच कसे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये चालले असा सवालही केला.

प्रकल्पावर आम्ही बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रोष दिसून येत आहे, दु:ख आहे. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष फक्त त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोविडच्या काळातही ज्यांनी राजकारण केलं, ते आम्हाला आज शिकवतायत की राजकारण करू नका. रोजगाराविषयी बोलणं हे राजकारण असेल तर ठीक आहे, आम्ही राजकारण करतो. पण मग राजकारण कशासाठी करायचं असतं? जर आम्ही प्रश्न विचारले, तर चुकलं कुठे? असा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

हेच केंद्र सरकार असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो. दावोसमध्ये गेल्यानंतर आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली. पण बेकायदेशीर खोके सरकार आल्यानंतरच अशा गोष्टी कशा घडायला लागल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यात सरकार आहे की नाही असाच सवाल निर्माण होत असून त्यांच्या खुर्चीत कोण बसतय हे ही कळत नाही अशी टीका शिंदे पिता-पुत्रांवर करत ते पुढे म्हणाले की, सरकार कोण चालवतयं हे स्पष्ट दिसतंय असेही ते म्हणाले.

आमच्या नावाची बदनामी करताय, आम्हाला नामशेष करायचा प्रयत्न करताय, आमच्या पाठीवर ४० आमदारांचे, १२ खासदारांचे वार करून निघून गेलात. अजून आमच्यावर किती वार करणार आहात असा सवाल करत आमच्या पाठीत वार केलात पण महाराष्ट्रावर वर का वार करत आहात? राज्यातील सुशिक्षितांच्या वाट्याचा रोजगार कशाला घालवता अशी टीकाही त्यांनी केला.
माझे तुम्हाला (बंडखोरांना) खुले आव्हान आहे. राज्यात महापालिकांच्या आणि विधानसभेच्या निवडणूका जाहीर करा. मी ही राजीनामा देतो आणि तुम्हीही राजीनामा द्या बघु या कोण निवडूण येतेय ते असे आव्हान देत ते म्हणाले, सत्ताधारी घाबरत असल्यानेच ते महापालिकेची निवडणूक घ्यायला तयार नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

हिंदूत्वाच्या नावावर हे लोक बाहेर गेले. मात्र हिंदू धर्मियांच्याच गणेशोस्तव मिरवणूकीत त्यांच्या पक्षाचा एक आमदार पोलिस स्टेशनच्या आवारात खुलेपणाने गोळीबार करतो हेच का यांचे हिंदूत्व असा टोला शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना लगावला.

देशाच्या इतर राज्यांमधून एखादा प्रकल्प त्यांच्या राज्याबाहेर गेला असता तर तेथील उद्योग मंत्र्याने राजीनामा दिला असता. पण राज्याचे उद्योगमंत्री खुशाल जॅकेट घालून फिरत आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला.

जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधकांनी आधी प्रकल्पाची जागा दाखवा मग आंदोलन करा असा सवाल करा पण मी सांगतो राज्य सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार इस्टेट एजंट नव्हती की जागा दाखवून उद्योग आणायला असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *