Breaking News

Editor

सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक शाहरूख खानवर जळतात.. पठाण चित्रपटावरून सध्या सुरु असलेल्या वादावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तत्पूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकनीवरून वाद निर्माण करत बॉयकॉट पठाण चळवळ काही जणांकडून सुरु करण्याचा प्रयत्न केला. तरीही पठाण प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या ती दिवसात या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने …

Read More »

शरद पवार म्हणाले, आम्ही एकत्र येऊ शकतो पण काही राज्यात परिस्थिती प्रतिकूल नाही कोल्हापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले भाजपा विरोधी आघाडीचे संकेत

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टूडे-सी-व्होटर कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात भाजपाला प्रतिकूल परिस्थिती दाखविली आहे. तर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल परिस्थिती दाखविली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या विरोधात बांधण्यात येणाऱ्या आघाडीवर भाष्य करत, राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात …

Read More »

मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर सुखोई-३० आणि मिराज-२००० विमानांची झाली धडक

मागील काही दिवसांमध्ये सुखोई-३० विमानांच्या अपघाताच्या घटनांची मालिकाच सुरु झाली होती. मात्र आज मध्य प्रदेशात सुखोई-३० आणि मिराज-२००० या हवाई दलाच्या विमानांची हवेतच टक्कर होऊन मोठी दुर्घटना मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्घटना घडताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील मोरेना …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. …

Read More »

संजय राऊत यांचा आंबेडकरांना टोला, मी कोण आहे उध्दव ठाकरे ठरवतील प्रकाश आंबेडकर यांच्या टोल्यावर राऊत यांचा पलटवार

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे संबध भाजपाशी असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना संजय राऊत यांनी आंबेडकरांना सल्ला देत पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत माझ्याबाबतीत उध्दव ठाकरे ठरवतील निर्णय …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …

Read More »

संजय राऊत यांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंनी सांगितल असत तर…. पवारांवरील आरोप हे पूर्वीच्या घटनांवरून त्याचा आता संबध नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, दगडांना नाचवत राहिलो पण आता खरे हिरे सापडले अद्वय हिरे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश सोहळ्यानंतर केली शिंदे गटावर टीका

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी आज भाजपाला राम राम करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी हिरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरे यांनी हिरे यांना शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश दिला. या प्रवेश सोहळ्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, …

Read More »

अद्वय हिरे म्हणाले, भाजपा नेत्यांच्या सततच्या आठवणीमुळे अखेर फोन बंद करावा लागला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे म्हणाले, भाजपाचे जे नेते इतक्या दिवस माझी आठवण …

Read More »