Breaking News

Editor

राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गेट-वे ऑफ इंडिया समोर होणार गौरव महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार …

Read More »

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅड्स “जन औषधी सुगम"ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

प्रधान मंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJY) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी …

Read More »

नाना पटोलेंची स्पष्टोक्ती, भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेऊ भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही

देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्यांना बरोबर घेण्याची …

Read More »

संभाजी पाटील-निलंगेकरांचा अमित देशमुखांना टोला, ज्यांना मुताऱ्या बांधता आल्या नाहीत त्यांना…. भाजपा सरकारच्या काळात सर्वाधिक निधी लातूरला दिला

मागील काही वर्षापासून काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर चढला होता. तसेच या पक्षातंरावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी सूचक वक्तव्य करत त्यास दुजोराही दिला. मात्र आता देशमुख कुटुंबिय भाजपात प्रवेश करणार नसल्याचे दिसून येताच भाजपाच्या नेत्यांनी अमित देशमुख यांच्यावर टीका करण्यास सुरुवात …

Read More »

रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर पलटवार करत ठाकरेंना म्हणाले, १९ मार्चला उत्तर देणार भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा

नुकतीच खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला …

Read More »

कसबा पेठ निकालावर शरद पवार म्हणाले, रविंद्र धंगेकरांना विश्वास होता, पण मला खात्री नव्हती… खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे भाजपासह सर्वपक्षियांशी मैत्रीपूर्ण संबध

कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उमेदवार उभे केले. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून चांगलीच ताकद लावण्यात आली. तर महाविकास आघाडीनेही पूर्ण ताकद लावली. या दोन्ही निकालांवरून सर्वच पक्षांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. तर कसबा पेठ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांच्या मोदीबागेतील …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, बीबीसी हे केवळ उदाहरण..पण सत्ताधारी वसाहतवादी मानसिकतेचे… २०२४ ची निवडणूक बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना सत्ताधाऱ्यांकडून वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला, यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, हे प्रकरण अदाणी यांच्यासारखेच आहे. ते देखील वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण होते. ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो, तिथे तिथे त्यांच्याकडून कारणे देण्यात येतात. खरेतर देशभरात विरोधातला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत …

Read More »

जलील यांच्या आंदोलनावर संजय शिरसाटांची मागणी, औरंगजेबाची ती कबरच हटवा… एमआयएमचे आंदोलन म्हणजे बिर्याणी पार्टी असल्याचा आरोप

नुकतेच केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतरास छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची काहीही हरकत नसल्याचे पत्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठविले. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून या संदर्भात अधिसूचना काढून नामांतराची प्रक्रिया सुरु केली. या नामांतराच्या निषेधार्थ ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे जाहिर …

Read More »

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला हिंदू रेट ऑफ ग्रोथ बाबत धोकादायक इशारा हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे काय रे भाऊ?

२०१४ सालापासून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटनांकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्यात येत आहेत. त्यामुळे देश सरळसरळ दोन धर्मांमध्ये विभागल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर तथा अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथमुळे खाजगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्याजदर, मंदावलेला आर्थिक विकास …

Read More »

१०१ शेतकऱ्यांची मागणीः पिकाला भाव मिळत नाही, राष्ट्रपतीजी इच्छा मरणाला परवानगी द्या राष्ट्रपती मुर्मु यांना पत्र लिहित केली मागणी

मागील काही महिन्यापासून नगदी पिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा, द्राक्षे, कापूस आदींसह भाजीपाल्यास बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला आणि अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने इच्छा मरणा परवानगी द्यावी अशी मागणी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील १०१ शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडत …

Read More »