Breaking News

Editor

वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्यावतीेने लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून यावर्षी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्याची २५ वर्षांची परंपरा अखंडित ठेवण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी चिखली येथील वाड्याची हुबेहुब प्रतिकृती आरास म्हणून मंडळाने साकारली …

Read More »

गृहमंत्र्यांनी करून दिली गणेशोत्सव आणि मोहरमसाठीच्या नियमावलींची आठवण : वाचा नियम उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने  करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. २२ ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण सुरु होत आहे. गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  १)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची …

Read More »

कोरोना: कालच्या तुलनेत बाधित आणि बरे होणारे आज जास्त: बरे होण्याचा दर ७१ टक्क्यावर १४ हजार ४९२ नवे बाधित, १२ हजार २४३ बरे झाले, ३२६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत बाधित आणि घरी जाणाऱ्यांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. काल बरे होण्याऱ्यांची संख्या ९ हजाराच्या घरात होती. तर बाधित रूग्णांची संख्या १३ हजारापेक्षा जास्त होती. आज तब्बल १४ हजार ४९२ नव्या बाधितांचे निदान झाले असून १२ हजार २४३ बरे होवून घरी गेले. …

Read More »

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तज्ञांची समिती: जानेवारीपासून नवे शैक्षणिक वर्ष ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण …

Read More »

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत  मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग ३ऱ्या वर्षी १७ पुरस्कारासह सर्वाधिक बक्षिसांचा मान राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राज्याची घोडदौड कायम-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली-मुंबई : प्रतिनिधी नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाश शिंदे यांनी आज येथे केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास …

Read More »

भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भीम आर्मी शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर मुंबईसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या दंगलीचे …

Read More »

मंत्री राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात दलित सरपंचाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले असता कारवाई

आझमगड-मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ? समिती स्थापनेचे आदेश उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत- उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून  सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते. …

Read More »

प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे …

Read More »