Breaking News

Editor

कोरोना : मुंबईत आजही २ हजाराहून जास्त तर एमएमआर आणि पुण्यात रूग्णसंख्या चढीच १९ हजार १६४ नवे बाधित रूग्ण, १७ हजार १८४ बरे तर ४५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजाराच्या आत आज नोंदविलेली असली तरी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून २ हजारापेक्षा जास्त रूग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे मुंबईसह महानगर प्रदेशात ४ हजार ७४० इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे विभागातही संख्येत वाढ होत असल्याने ४ हजार ९५६ इतके रूग्ण …

Read More »

आता या किंमतीत मिळणार प्लाझ्माची बॅग; वाढीव दराने विकल्यास कारवाई होणार साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित …

Read More »

घरेलू कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शिष्टमंडळाला ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेल्या घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने काल महिला व  बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांना त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिली. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन …

Read More »

घर कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आणा; घरेलू कामगारांचा राष्ट्रीय मंचचे आंदोलन लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये मागण्यांचा प्रचार करणार

मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने अमनधपक्या पद्धतीने श्रमविरोधी कामगार कायद्यांच्या संहीतेला संसदेत मंजूर करून घेतले, ह्या हालचालींचा अंदाज देशातील कामगार संघटनांना होताच् आणि त्याच्या रोक थामासाठी संहीतेत कामगार व असंघटित कामगारांची बाजू मांडण्याचा व त्यात सुधारणा करण्याचा संसदीय मार्ग आपले म्हंणने पार्लमेंट सँन्डींग कमेटी, लेबर डिपार्टमेंट, सर्व पक्षीय खासदार …

Read More »

सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारणार ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्याचे प्रस्तावित असून सर्व प्रशासकीय पूर्तता करुन लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना स्वतंत्र इमारत उपलब्ध …

Read More »

रेशनिंग व्यवस्थेबद्दल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे मंत्री भुजबळांना पत्र; केल्या या मागण्या पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याबरोबरच एसएमएस सेवा पुन्हा सुरु करा

मुंबई : प्रतिनिधी   प्रति, ना.श्री.छगन भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन.   विषय: रेशनिंग व्यवस्थेतील धान्य, शिधावस्तुंची गळती, भ्रष्टाचार, कार्डधारकांची फसवणूक, नियमांविषयी, अधिकारांविषयी लोकांमध्ये असणारे अज्ञान, संदिग्धता यांसारख्या त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पारदर्शक व्यवस्थेसाठी खालील मागण्या करत आहोत.   मा.महोदय, रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार स्थानिक पातळीवर …

Read More »

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? ड्रग कनेक्शन चौकशीत एनसीबीची कंगणावर मेहरबानी का? काँग्रेसचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

राज्य मंत्रिमंडळातील १० वे मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राज्यमंत्री कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता शिवसेनेचे सर्वाधिक कार्यक्षम म्हणून लौकिक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी आज स्वत: ट्विटरवरून दिली. आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, डॉ.जितेंन्द्र आव्हाड, हसन मुश्रीफ, डॉ.नितीन राऊत, …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता …

Read More »

पंतप्रधान म्हणाले “महाराष्ट्र के लोग बहादूर”, तर मुख्यमंत्री म्हणाले ” लढ्याचा परिणाम दिसेल” पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई: प्रतिनिधी माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार …

Read More »