Breaking News

मतदानामुळे २१ आणि २२ ऑक्टोंबर रोजीच्या परिक्षांचे फेरनियोजन मुंबई विद्यापीठाकडून प्रसिध्दी पत्रक जारी

मुंबई : प्रतिनिधी
२१ ऑक्टोबर, २०१९ रोजीची विधानसभा निवडणूक मतदान लक्षात घेता परीक्षा विभाग मुंबई विद्यापीठाने दि.२१ व २२ ऑक्टोबर या दोन तारखांच्या नियोजित परीक्षांचे फेरनियोजन केले आहे. जेणेकरून मतदान प्रक्रिया व परीक्षांचे वेळापत्रक या दोन्ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून पार पडता येतील. २१ व २२ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मुंबई विद्यापीठाची एकही परीक्षा नियोजित नाही.
यानुसार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या २२ परीक्षांचे एकूण ६० पेपर्स, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या २२ परीक्षांचे ५७ पेपर्स, मानवताशास्त्र शाखेच्या ११ परीक्षांचे १६५ पेपर्स तसेच आंतरविद्या शाखेच्या १३ परीक्षांचे २१ पेपर्स याचे फेरनियोजन केले आहे. या अनुषंगाने एकूण ६८ परीक्षांचे ३०३ पेपर्सच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
२१ व २२ ऑक्टोबर या दोन तारखांना ज्या विषयांच्या परीक्षा होत्या, त्या दोन दिवसाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने, नवीन सुधारित परीक्षांचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सदर सुधारित वेळापत्रकाचे अवलोकन करून परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करावे असे आवाहन डॉ.विनोद पाटील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *