Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा टोला, …तर औषध देण्यासाठी आता डॉ एकनाथ शिंदे यांना आणलं उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

गडचिरोली, धुळे नंतर आज नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टोलेबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणच्याही पोटात दुखलं तर त्यावरील औषध देण्यासाठी डॉ एकनाथ शिंदे यांना आणलं आहे, असे सांगत अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांना लगावत पुढे म्हणाले, तसेच यापूर्वीचे मुख्यमंत्री म्हणायचे आम्हाला अर्थसंकल्पातील काय कळतं, आम्हाला म्हणत होते शेतीतलं काय कळतं, सहकारातील काय कळत पण आज त्यांना राजकारणातील काय कळत होतं हे दस्तुरखुद्द पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आणि त्यांना राजकारण कळत नाही असे सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, चांगलं काम केलं, लोकांना लाभ दिला, तरी काहींच्या पोटात दुखते. ‘शासन आपल्या दारी’ योजना कशासाठी? लोक कशासाठी जमा करता? असे सवाल काहीजण उपस्थित करतात. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून ते येतात. मग, तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, कोणाच्याही पोटात दुखलं तर, त्यावरील औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदे यांना आम्ही आणलं आहे. त्यांचं पचनी पडलं नाहीतर अजित पवार आहेत. त्यामुळे सर्वांच्या पोटदुखीवरील उपचार आपण करणार आहोत, असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वीचे मुख्यमंत्री मला अर्थसंकल्प, सहकार, शेतीतलं काहीच कळत नाही असं सांगायचे. मग, शरद पवार यांनी पुस्तक लिहिलं. त्यात शरद पवारांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंना राजकारणातील काहीच कळत नाही. पण, आता असं नाही. आम्हाला राजकारण, अर्थसंकल्प, सहकार, शेतीतील माहिती आहे. म्हणून काळजी करू नका. आता जे निर्णय होतील, ते सामान्य माणसाचे होतील, असेही म्हणाले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *