Breaking News

महेश तपासेंचा सवाल, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते – पडळकर शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचारी विनावेतन

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

महेश तपासे म्हणाले, राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार असताना या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला ३६० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या कोषातून केली जात होती. आता सहा महिन्यापासून शिंदे – फडणवीस सरकार आले आहे तरी देखील कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही हे दुर्दैवी आहे असे मतही व्यक्त केले.

भाजपाप्रणीत सरकार आले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे तेच पगाराचे ओझे आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे मसिहा बनण्याचा प्रयत्न करणारे सदावर्ते आणि पडळकर काय भूमिका घेणार हे आता त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *