Breaking News

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब घटनेच्या वृत्ताने एकच खळबळ

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात बॉम्बशेल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी बॉम्बशेल आढळला, तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच आहे. हा बॉम्बशेल आंब्याची बाग असलेल्या परिसरात आढळून आला.

हा भाग पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून १ किमी अंतरावर तर भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून २ किमी अंतरावर आहे.

या भागात एक जिवंत बॉम्बशेल आढळला आहे. या घटनेनंतर येथे पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांच्या मदतीने हा बॉम्बशेल निकामी करण्यात आला आहे. या परिसराती नाकेबंदी करण्यात आली आहे. बॉम्बशेल येथे कसा आला, याचा शोध घेतला जात असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती चंदिगडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी दिली.

Check Also

निज्जर हत्येप्रकरणी तीघांना अटक पण भारत-ऑस्ट्रेलियात संबध दुरावलेलेच

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दावा केला की त्यांना भारत-नियुक्त दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित तीन भारतीयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *