Breaking News

बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी केली ३७ शेतकऱ्यांना अटक

औरंगाबाद: प्रतिनिधी

कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाच्याविरोधात संतापलेल्या ३७ शेतकर्‍यांनी (बुधवारी) दुपारी १ च्या सुमारास सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक केली.

गंगापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी क्रांती चौकात मिनरल वॉटरच्या बाटल्यांमधुन आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी ३७ आंदोलकांना आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करत त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.

राज्य सरकार विरोधात शेतकरी टोकाची भूमिका का घेत आहेत ? याचा सरकारने गांभिर्याने विचार करावा अशी माहिती आंदोलकांनी माध्यमांशी बोलतांना दिली. सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने सामूहीक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी क्रांती चौकात येवून आंदोलनास सुरुवात केली. घटनास्थळी पोलिस  निरीक्षक श्रीपाद परोपकारी ताफ्यासहित पोहोचत सामूहीक आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *