Breaking News

प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली

मुंबईः प्रतिनिधी

नोव्हेंबरमध्ये प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार राहिली आहे. या महिन्यात प्रमुख ८ उद्योग क्षेत्रांनी ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोंबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ५ टक्के होता. ऱिफायनरी, सिमेंट आणि स्टील उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रमुख उद्योग क्षेत्रांची कामगिरी चांगली राहिली असल्याचे उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये कोळसा, कच्चे तेल, नॅचरल गॅस, रिफाइनरी प्रोडक्ट्स, फर्टिलाइजर्स, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटीची वाढ अवघी ३.२ टक्के राहिली होती.

उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर नोव्हेंबर २०१७ मध्ये रिफाइनरी प्रोडक्ट्स, स्टील आणि सिमेंट उद्योगात अनुक्रमे ८.२ टक्के, १६.६ टक्के आणि १७.३ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या महिन्यात कच्चे तेल आणि नॅचरल गॅसच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. मात्र, कोळसा उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीचा विचार करता ८ प्रमुख उद्योगांची वाढ ३.९ टक्के राहिली आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ही वाढ ५.३ टक्के होती.

आयआयपी वाढण्याची आशा

प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या चांगल्या वाढीचा परिणाम एकूण उद्योग उत्पादनात म्हणजे आयआयपीवर दिसू शकतो. याचे कारण म्हणजे या आठ उद्योगांचा एकूण आयआयपीमध्ये ४१ टक्के हिस्सा आहे.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *