Breaking News

आणि मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबविली काळ पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाचा निर्णय

अलिबाग: प्रतिनिधी

उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग विभाग, पेण यांनी माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याचे सांगितल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे.

त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही. राज्य महामार्ग विभाग व पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसिलदार, माणगाव यांनी कळविली आहे.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *