Breaking News

Tag Archives: winter session at nagpur

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर …

Read More »

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण …

Read More »

कर्जावरून नाना पटोले यांचा सवाल, पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त भरपूर दिले भरपूर दिले अशा घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर …

Read More »

अजित पवार यांनी मांडल्या भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूरात सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर पुढील काही महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणूका आणि त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या खर्चाचा अंदाज धरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …

Read More »

नाना पटोले यांची आरोप, … स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा …

Read More »

सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…

राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, … सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मार्च मध्ये १ लाख कोटींचे कर्ज काढणार

नागपूरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत राज्यातील समस्येसंदर्भातील प्रश्नावलीचे पत्र राज्य सरकारला लिहिले. या पत्राचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढील काही दिवसात राज्याच्या कर्जाची रक्कम ही ७ लाख कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती दिली. राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर …

Read More »

हिवाळी अधिवेशनातील त्या भेटीवर दिपक केसरकर म्हणाले, तर शिवसेना एकसंध होईल मी लवकरच एक-दोन दिवसात बोलेन

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सातत्याने सुरु आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अधिवेशन सुरु असताना उपसभापतींच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची चर्चा चांगलीच …

Read More »

काय करायचं सांगा, सरकार बदललं तसं गुणांका(टक्के)चा आणखी एक टेबलही वाढला कंत्राटदाराकडून नागपूरातील हिवाळी अधिवेशनात धावाधाव

राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाले. मात्र या सहा महिन्यात जितकी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची झाली. तितकीच चर्चा सरकारी कंत्राटापोटी आणि झालेली कारवाई रद्द करण्यासाठी जे काही गुणांक द्यावे लागतात त्याच्या दरात जवळपास डबल वाढ झाली असल्याची चर्चा सुरु झाली असून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील गुणांका …

Read More »