Breaking News

अजित पवार यांनी मांडल्या भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूरात सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर पुढील काही महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणूका आणि त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या खर्चाचा अंदाज धरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आज पहिल्यांदा विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेत सादर केल्या.

अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात एकूण रु. ५५,५२०.७७ कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. पुरवणी मागण्यातील ५५ हजार ५२० कोटींपैकी रु.१९,२४४.३४ कोटीच्या अनिवार्य, रु.३२,७९२.८१ कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु. ३,४८३.६२ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या सादर केलेला आहे.
रु. ५५,५२०.७७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा रु. ४८,३८४.६६ कोटी एवढा आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-

(रुपये कोटीत)
अ.क्र. बाब रक्कम

1. जल जीवन मिशन (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक)
४२८३.००

2. एकत्रित प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघु, मध्यम, मोठया उद्योग घटकांना व विशाल प्रकल्पांना विविध प्रोत्साहनपर रक्कम
३०००.००

3. महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुखसोयीच्या विकासासाठी व नगरपालिका नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान व रस्ता अनुदान व नगरोत्थान
३०००.००
4. प्रधानमंत्री पीक विमा योजना – विमा हप्ता
२७६८.१२

5. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन
२७२८.४१
6. केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी ५० वर्ष कालावधीचे बिनव्याजी कर्ज
२७१३.५०
7. राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा व इतर मार्ग योजना अंतर्गत रस्ते बांधकाम, रस्ते व पुल दुरूस्ती
२४५०.००
8. श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना
२३००.००
9. आशियाई विकास बँकेकडून प्राप्त होणारे कर्ज
२२७६.००
10. नमो शेतकरी महासन्मान निधी
२१७५.२८
11. यंत्रमाग, वस्त्रोद्योग व कृषीपंप ग्राहकांना विजदरात सवलत
१९९७.४९

12. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी – १५ केंद्रीय वित्त आयोगाचा निधी
१९१८.३५
13. नाबार्डचे कर्ज, हुडको, व REC लि.कडून घेतलेल्या कर्जाची व व्याजाची परतफेड
१४३९.००
14. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती- इतर मागासवर्गीय, विजा.भज व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता
१०४६.०२
15. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीची प्रतिपूर्ती
१०००.००
16. मोदी आवास घरकुल योजना – इतर मागासवर्गीय लाभार्थी
१०००.००
17. मुंबई मेट्रो – मुद्रांक शुल्कांचे प्रदान
१०००.००
18. अन्न धान्य व्यवहारांतर्गत तूट
९९७.०५
19. स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी
९९६.६०
20. पोलीस विभागातील कार्यालयीन इमारतींचे बांधकाम व निवासी अनिवासी इमारत दुरूस्ती
६९८.६६
21. संजय गांधी निराधार अनुदान योजना ६८७.००
22. विविध पाटबंधारे विकास महामंडळांना विविध योजनांसाठी भांडवली अंशदान
६००.००
23. अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मुलभूत पाय़ाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
५००.००

या पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झालेल्या आहेत, ते विभाग पुढीलप्रमाणे :-

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

1. सार्वजनिक बांधकाम विभाग
५४९२.३८
2. कृषी व पदुम विभाग
५३५१.६६
3. नगर विकास विभाग
५०१५.१२
4. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
४८७८.६७
5. ग्रामविकास विभाग
४०१९.१८
6. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
३५५५.१६
7. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
३४९५.३७
8.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
३४७६.७७
9. इतर मागास बहुजन कल्याण विभाग
३३७७.६२
10. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
३०८१.२९
11. गृह विभाग
२९५२.५४
12. आदिवासी विकास विभाग
२०५८.१६
13. सार्वजनिक आरोग्य विभाग
१३६६.९९
14. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
११७६.९६
15. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
९९९.७२
16. महसूल व वन विभाग
७८७.१२
17. जलसंपदा विभाग
७५१.७०
18. उच्च व तंत्र शिक्षण विभाग
७३६.८८
19. अल्पसंख्याक विकास विभाग
६२६.८१
20. नियोजन विभाग
६००.००
21.विधी व न्याय विभाग
४०८.४७
22.महिला व बाल विकास विभाग
३७५.२९
23. वित्त विभाग
३१६.१५

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *