Breaking News

सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…

राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

तसेच त्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी ज्या अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या आरोपास ४८ तासही उलटत नाहीत. तोच अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या कधी पत्र लिहिणार याची आम्ही वाट पहात आहोत असा खोचक टोलाही लगावला.

तसेच सुषमा अंधारे यांनी नवाब मलिक यांच्यावर भाजपाचेच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनीच केलेल्या देशद्रोहाची आठवण करून देत अजित पवार यांनाही सत्तेत सहभागी करून घेतल्याची उपरती कधी होणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करत राजकिय कुरघोडी केली.

Check Also

गुजरातमधील पहिल्या आणि सर्वाधिक लांबीच्या समुद्रावरील सुदर्शन सेतूचे उद्घाटन

गुजरातमधील अरबी समुद्रातील बेत द्वारका देवभूमी ते ओखा या मुख्य भूमिकेची जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अर्थात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *