Breaking News

Tag Archives: sadabhau khot

अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली हात जोडून ही विनंती गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका…राजकिय पोळ्या भाजू नका

मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात …

Read More »

ऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी लागू करण्यात आलेल्या एफआरपी कायद्याच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी कायदा आणणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देत कायद्याची निर्मिती झाल्यानंतर दुधाला हमी भाव देण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात …

Read More »

केंद्रातील भाजपा सरकारला फडणवीसांनी दिला घरचा आहेर लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे बंद झाल्याची कबुली

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीकांचे काम-धंदे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची स्पष्ट कबुली राज्यातील भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत असल्याचे किंवा अनेकांचे रोजगार गेल्याने नागरीकांसाठी कोणत्याही पध्दतीचे पॅकेज देण्यास एकाबाजूला …

Read More »

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे  कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …

Read More »

युतीच्या चर्चेचा पत्ता नसताना भाजपासाठी मित्रपक्षांकडून राज्यपालांना गळ केंद्रीय राज्यमंत्री आठवले, खोत, जानकर, पाटील यांनी घेतली राज्यपालाची भेट

मुंबईः प्रतिनिधी राज्यात महायुतीला जनादेश मिळालेला असतानाही भाजपा-शिवसेनेकडून राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गाडे अडले असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या रिपाई, रासप, रयत संघटना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी भाजपालाच बोलवा अशी गळ घातल्याची माहिती मित्रपक्षांनी केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

Read More »

“कृषी संवाद” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंत्र्याकडे मांडता येणार प्रश्न उपक्रमाचा कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी एकाच वेळी राज्यातील १० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या “कृषी संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला.या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. …

Read More »

दुष्काळामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असला तरी राज्यातल्या जनतेला कमतरता भासणार नसल्याचा दिलासा सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर जे कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिला नाही अशा ११ कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणीही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना करणार त्यांनी …

Read More »

महाराष्ट्रातही दुधाच्या भुकटीला ५० रुपये अनुदान द्या कृषी राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मान्सूनच्या अनुकूलतेमुळे आगामी काळात दुधाचे उत्पन्न वाढणार असून त्याचा परिणाम दुधाचे आणखी दर घसरण्यावर होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही  गुजरात राज्याप्रमाणे दुधाच्या भुकटीवर ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गुजरात राज्यामद्ये दूध उत्पादकांना …

Read More »