Breaking News

Tag Archives: sachin sawant

काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान मोदीजींच्या जन्माआधीपासूनच रेल्वे सबसिडीमध्ये चालते, कोविडसाठी काय दिले? सवाल

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, ‘उपेक्षित’ सचिन सावंत हे तर खोटे बोलण्याची फँक्टरी स्थलांतरित मजुरांसाठीच्या रेल्वेचा ८५ टक्के खर्च हा केंद्राकडूनच भाजपाचा दावा

मुंबई: प्रतिनिधी मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जिवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्‍यांच्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …

Read More »

सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांना गृहराज्यात पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याच्या भाजपाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. या प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड …

Read More »

गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची योगायोगाने बदली न्यायाधीशांच्या बदलांतील तथाकथीत योगायोग चिंता वाढवणारा : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी मागील सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा त्यांनी दिलेले निवाडे आणि टिप्पण्या या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र या बदल्या रुटीन असल्याची सांगण्यात आले‌. परंतु हा तथाकथीत वाढलेला योगायोग चिंताजनक असून दोनच दिवसापूर्वी ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या …

Read More »

गुजरातच म्हणतेय, चाचणी करत नसल्याने अहमदाबादेत ४० लाख कोरोना रुग्ण भाजपशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जातेय : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधार कोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली. गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये …

Read More »

भाजपाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्र सहभागी झाल्याचा दावा केला असता प्रत्येक प्रसिध्दीपत्रकासोबत मोफत हाजमोला गोळ्या वाटण्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा खोचक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल …

Read More »

स्थलांतरीत मजुरांचे ८५ % रेल्वे भाडे दिल्याचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा ! काँग्रेसचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आव्हान

मुंबई: प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने खोटे बोलण्याचा प्रघात चालू ठेवलेला असून भारत सरकार रेल्वे तिकीटाचे ८५ टक्के खर्च करत आहे याचा पुरावा चंद्रकांत पाटील यांनी द्यावा अन्यथा जनतेची माफी मागावी असे थेट आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

२१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनावर मात करण्याच्या बाता हवेतच देशाला संकटात ढकलून मोदी सरकारचे हात वर; देश आता रामभरोसे ?: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने रेल्वे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांचे कोरोनाबरोबर जगायला शिका असे म्हणणे याचा अर्थ मोदी सरकारने करोनाविरुद्धच्या लढाईत हात वर केले आहेत. संकट मोठे असतानाही देशाला मोदींनी राम भरोसे सोडले आहे का? केंद्र सरकारकडे आता काही उपाय शिल्लक राहिले नाहीत …

Read More »

मजुरांच्या दैन्यावस्थेबद्दल आयोगाने राज्याला नव्हे तर केंद्राला नोटीस बजावावी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी …

Read More »

फडणवीस सरकारने केली महाराष्ट्राची घोर फसवणूक! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात राज्याला पुढे आणण्याचा अट्टाहास लपून राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहत नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु गुजरातचे महत्त्व वाढण्याकरीता महाराष्ट्राच्या हितांना मुठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल असे कधीच वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला …

Read More »