Breaking News

Tag Archives: rajesh tope

राज्यातील सर्व शासकिय आणि खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्ष कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी राज्यातील सर्वच शासकिय आणि खाजगी रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, …

Read More »

राज्यात रूग्णांच्या संख्येत १२०, तर मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ ६६ रूग्णांना घरी पाठविले, ८६८ वर बाधीत

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना सातत्याने विनंती करूनही सतत रस्त्यावर गर्दी करणे, कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज दिवसभरात १२० नव्या रूग्णांचे निदान झाले असून मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोगाग्रस्तांची संख्या ८६८ वर पोहोचली मृतकांची संख्या ५२ …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात प्रवेश, लॉकडाऊन वाढणार ? मे-जून पर्यत वाढण्याची शक्यता

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉकडाऊन जाहीर केले. मात्र सुशिक्षत असूनही अडाणी व्यक्तीसारख्या वागणाऱ्या नागरिकांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आपण आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या आजाराचा आणखी प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत. पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात …

Read More »

अडीच हजार पथकांनी केले सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथके, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४१३, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २१० पथके कार्यरत तर  राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत …

Read More »

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …

Read More »

कोरोनावरील उपचारासाठी कोकणसह मराठवाडा, विदर्भात विशेष रुग्णालये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील कोकणसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ३० शासकीय रुग्णालयांचे रूपांतर कोरोनासाठीच्या विशेष रुग्णालयात करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून त्यासाठी २३०५ खाटा उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच …

Read More »

घरबसल्या करोना चाचणी करायची मग वापरा हे ऑनलाईन टूल राज्य सरकारकडून स्वचाचणी टूलची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर करोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. हे स्व-चाचणी टूल …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

आणि राज्याचा कामगार विभाग जागा झाला बांधकाम कामगार, असंघटीत कामगारांची संख्या विभागालाच माहित नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील संघटीत क्षेत्राबरोबरच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी राज्यात कामगार विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या कित्येक वर्षात राज्यातील असंघटीत क्षेत्रात किती कामगार काम करत आहेत, बांधकाम कामगार किती आहेत याची साधी माहिती गोळा करण्याचे काम अद्याप या विभागाने केलेले नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »