Breaking News

Tag Archives: ncp

शिवसेनेच्या व्हिपवर शरद पवार म्हणाले, बंडखोरांना व्हिप पाळावाच लागेल अन्यथा… विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी अद्यापही नरहरी झिरवळ

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आणि अध्यक्ष पदाचे अधिकार असलेले अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, … काय चाललंय हे जनतेला दिसतय महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार...

आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो. मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आज विधानसभा अध्यक्ष …

Read More »

शरद पवार म्हणाले, मी अनेकवेळा शपथ घेतली पण… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना पेढा भरविल्याप्रकरणी लगावला टोला

शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दावा करण्यास गेलेल्या एकनाथ शिंदे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पेढा भरविल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. भारतीय …

Read More »

विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या विरोधात मविआचा उमेदवार विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावरील या शिंदे सरकारला ३ आणि ४ जुलै रोजी बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्ष …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान, हे सरकार फार काळ… भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रासंगिक करार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाळी माजवित एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यानंतरही १० दिवसानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकिय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरीकांमधून वेगवेगळ्या पध्दतीचे तर्क व्यक्त करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारला …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, यांची तर दोन चाकी स्कुटर; मात्र हँडल… हँडल असलेला व्यक्ती जिथे हवी तिथे स्कूटर नेणार

राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधण्यात आले. मात्र काल महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. ही दोन चाकांची स्कूटर आहे. या सरकारमध्ये पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे तो जिथे हवी तिथे स्कूटर घेऊन जाईल …

Read More »

शिंदे सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवार म्हणाले, फडणवीस नाराज मनाने… एकनाथ शिंदे आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री योगायोगाने साताऱ्याचे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन २४ तास उलटत नाही तोच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आज झाला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपामधील असंवादावर बोट ठेवण्याचा प्रयत्न …

Read More »

अस्थिर राजकिय परिस्थितीवर अमोल मिटकरी म्हणाले, अजून बरंच काही… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत व्यक्त केला संशय

राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात राज्य सरकार आणि शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवाजी महाराज यांचे नाव घेता मग… आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील

जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. आपल्या …

Read More »

आणि शरद पवार यांनी थांबविले मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी उध्दव ठाकरे निघाले होते राजभवनावर

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील संभ्रमावस्थेवर जैसे थे असे आदेश देत बंडखोर आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १२ जुलै पर्यंतची मुदत दिली. तर गटनेते पदी अजय चौधरी आणि प्रतोद पदावरील सुनिल प्रभू यांच्या नियुक्तीवरूनही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेसह शिवसेनेला नोटीस दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …

Read More »